शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गैरमार्गाविरूध्द लढा कृती कार्यक्रम

By admin | Updated: February 11, 2015 01:30 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत राज्यातील नऊ विभागीय मंडळाव्दारे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये...

केशोरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत राज्यातील नऊ विभागीय मंडळाव्दारे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये इयत्ता १० व १२ वीच्या परीक्षांचे आयोजन केले आहे. या परीक्षांना राज्यातून सुमारे ३२ लाख विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्वसमावेशक असा कृती कार्यक्रम आखून गैरमार्गाविरूध्द लढा हा कार्यक्रम राबविण्याचे दृष्टीने समाजातील घटकांचा सहभाग घेऊन तणावमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन शाळा व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून केले आहे. परीक्षेत विविध मार्गानी निष्पन्न होणाऱ्या गैरप्रकाराचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने मंडळ आपापल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. शिक्षण मंडळाने गैरमार्गाविरूध्द लढा या कृती कार्यक्रमांतर्गत परीक्षा केंद्राबाहेरील उपद्रव थांबविण्यासाठी समाजाची मदत घेऊन स्थानिक दक्षता समित्यांच्या माध्यमातून नियंत्रण आणणे, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व संस्थाचालक यांचे उद्बोधन व समुपदेशन करण्याचे वेळापत्रक तयार करून ते कार्यवाहीत आणणे, विद्यार्थ्यांना गैरमार्गापासून परावृत्त करण्यासाठीच्या प्रयत्नांबरोबर शिक्षा सुची विषयक नियम यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका, केंद्र, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर दिलेल्या कालावधीत बैठका आयोजित करून गैरमार्गाविरूध्द लढा या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शिवाय शहरी व ग्रामीण भागात केंद्रस्थळी दक्षता समित्या गठीत करून दक्षता समितीची संरचना साधारणत: अशी निश्चित केली आहे. सरपंच, पोलीस पाटील, शिक्षण समिती सदस्य, माजी सैनिक, तरूण मंडळ अध्यक्ष, पालक प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, बचत गटाचे सदस्य, प्रतिष्ठीत संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस प्रतिनिधी, तंटामुक्त समिती प्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश करून दक्षता समिती निर्माण करण्यात यावी असे सूचित केले आहे. (वार्ताहर)