शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाची रक्कम आईच्या खात्यावर

By admin | Updated: May 4, 2017 00:58 IST

प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून

 ३ कोटी ९ लाख मंजूर : जिल्ह्यातील ७७ हजार ३८२ विद्यार्थी लाभार्थी निलकंठ भुते   चिरचाळबांध प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोडी गणवेशाची रक्कम देण्यात येते. यापूर्वी ही रक्कम शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती. परंतु आता ही रक्कम सरळ विद्यार्थ्यांचे नविन खाते आईसोबत संयुक्त पध्दतीने काढले जाणार असून त्या खात्यावर ही रक्कम टाकली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व श्रीमंत गरीब असा भेदभाव नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची योजना शासनाने सुरू केली. शाळेत सर्व विद्यार्थी गणवेशात यावे यासाठी शासनाने वर्षातून दोन गणवेश विद्यार्थ्यांना देण्याची सोय केली. वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थीनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येते. या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी त्या गणवेशाची रक्कम त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळून त्या गणवेशाची खरेदी करायचे. एका गणवेशासाठी २०० रूपये असे दोन गणवेशासाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्याच्या मागे शाळेला मिळत होते. परंतु या गणवेशातही मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्याच्या बातम्या झळकत असल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आली. आता ही रक्कम सार्व शिक्षा अभियानाकडून शाळा समितीलाच देण्यात येणार आहे. परंतु विद्यार्थी व त्याची आई यांचे संयुक्त खाते शुन्य रूपयात उघडलेल्या खात्यावर टाकायची आहे. यामुळे आत गणवेशाच्या पैश्यात घोळ होणार नाही. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ च्या ४२ हजार ५८५ मुली, अनुसूचित जातीच्या ४ हजार ७७९ मुले, अनुसूचित जमातीचे ६ हजार ६६५ मुले व दारिद्रय रेषेखालील २३ हजार ३५३ मुले असे एकूण ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोडी गणवेश सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी दिले जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी गणवेशातच जाणार आहेत. ३ कोटी ९ लाख मंजूर सन २०१७-१८ या सत्रातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाने मंजूर केले आहेत. ही रक्कम आल्या बरोबर शाळा समित्यांना पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईतर्फे निधी पाठविण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे समजते. खात्याची चौकशी करावी शाळा समितीने विद्यार्थी व आईच्या शुन्य बॅलेंन्सवर असलेल्या खात्यात गणवेशाचा निधी टाकावा असे शासनाने सूचविले. परंतु यात शाळा समित्या विद्यार्थी वि त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यावर पैसे टाकतात किंवा नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे. जे खात्यावर पैसी टाकतील ते विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कमीशन तर घेत नाही ना यावर करडी नजर ठेवणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने याकडे जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.