शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

धनादेशात खोडतोड करुन काढली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:12 IST

सात हजार रुपयांच्या धनादेशावर खोडतोड करुन १ लाख सात हजार रुपये विड्राल करण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्रामपंचायमध्ये उघडकीस आला आहे. यात तत्कालीन ग्रामसेवकाचा सहभाग असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकाचा प्रताप : सरपंच नसताना केली स्वाक्षरी

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : सात हजार रुपयांच्या धनादेशावर खोडतोड करुन १ लाख सात हजार रुपये विड्राल करण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्रामपंचायमध्ये उघडकीस आला आहे. यात तत्कालीन ग्रामसेवकाचा सहभाग असल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार काचेवानी ग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामसेवक हसंराज वासनिक व तत्कालीन सरपंच प्रमिला रहांगडाले यांनी तिरोडा येथील युनियन बँकेत सामान्य फंडाचे बोगस खाते उघडले. खाते क्र. ५९४३०२०१०००५०५१ असून यातून १५ एप्रिल २०१४ ला तत्कालीन सरपंच रहांगडाले व ग्रामसेवक वासनिक यांच्या संयुक्त सहीने १ लाख ७ हजार रुपये रुपये विड्राल करण्यात आले.धनादेश क्र. ००९२६४ चे अवलोकन केल्यास केवळ ७००० रुपये काढायचे होते, पण याच धनादेशामध्ये सुरुवातीला खोडतोड करुन १ लाख ७ हजार रुपये करुन ग्रामसेवक वासनिक यांनी काढून तत्कालीन सरपंच यांची फसवणूक केल्याचे बँकेतून घेतलेल्या विड्राल धनादेशाव्दारे काढल्याचे स्पष्ट होते. युनियन बँक शाखा तिरोडा येथून विड्राल केलेल्या धनादेशाच्या प्रकरणी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युनियन बँकेचे शाखाधिकारी आणि कॅशियर यांनी धनादेशावर खोडतोड असताना मोठ्या रकमेचा धनादेश विड्राल कसा दिला. यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.धनादेश खोडतोड आणि रकमेत वाढ केल्याप्रकरणी पोलीस तक्रार करुन फसवणूक व धनादेश अनादर प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच युनियन बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान वासनिक यांच्या कार्यकाळातील प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.बोगस खाते व अपहार रकमेची माहिती मिळणारकाचेवानी ग्रामपंचायतमध्ये २०१० ते २०१५-१६ पर्यंत कमीत कमी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याची माहिती आहे. मुंडीकोटा येथील बँक सहित तिरोडा व परिसरातील बँकेत ग्रा.पं.च्या खाते व्यतिरिक्त बाहेर खाते उघडून अपहार केल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. याची चौकशी सुद्धा केली जात असल्याचे विद्यमान सरपंच लवंगदास भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfraudधोकेबाजी