शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ऑफलाईन तरी शुल्क मात्र 100 टक्के, पालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

शाळा ऑफलाईन तरी शुल्क का शंभर टक्के असा सवाल पालकांकडून केला जात आहे. शाळा संचालकांनासुध्दा कोरोनाचा फटका बसला, हे मान्य. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल न करता त्यात काही प्रमाणात सूट द्यावी, असा पालकांचा सूर आहे, तर खासगी शाळा संचालकांनुसार मागील दीड वर्षांपासून शाळा ऑनलाईन असल्या तरी शिक्षकांचे पगार, भाडे, वीजबिल आणि कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करावेच लागत आहे.

ठळक मुद्देखासगी शाळांनी शुल्क कमी करण्याची गरज : सुविधांमध्ये झाली कपात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. सरकारी असो वा खासगी शाळांनी मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू ठेवले आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांच्या खर्चात बरीच बचत झाली. मात्र, यानंतरही काही खासगी शाळांकडून पूर्ण फी वसूल केली जात आहे. तसेच फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होत आहे. शाळा ऑफलाईन तरी शुल्क का शंभर टक्के असा सवाल पालकांकडून केला जात आहे. शाळा संचालकांनासुध्दा कोरोनाचा फटका बसला, हे मान्य. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल न करता त्यात काही प्रमाणात सूट द्यावी, असा पालकांचा सूर आहे, तर खासगी शाळा संचालकांनुसार मागील दीड वर्षांपासून शाळा ऑनलाईन असल्या तरी शिक्षकांचे पगार, भाडे, वीजबिल आणि कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करावेच लागत आहे. त्यामुळे हा सर्व खर्च करावा लागत असून, अनेक पालकांनी मागील दीड वर्षांपासून फी भरली नाही. त्यामुळे शाळा संचालक अडचणीत आले असून, त्यांना सुध्दा कर्ज काढून गरज भागवावी लागत असल्याचे सांगितले. 

शंभर टक्के फी कशासाठी ? मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने शाळेत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवरील खर्च कमी झाला आहे. मात्र, यानंतरही शाळांकडून शंभर टक्के फीसाठी तगादा लावला जात आहे. मात्र, शाळा संचालकांनीसुध्दा पालकांच्या परिस्थितीचा विचार करून फीमध्ये थोडी सवलत देण्याची गरज आहे. - सुरेंद्र शर्मा, पालकऑनलाईन शिक्षणामुळे शाळांच्या विजेच्या आणि इतर खर्चातसुध्दा मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. तसेच शिक्षकांनासुध्दा पूर्ण पगार दिले जात नाही. पण, पालकांकडून मात्र शंभर टक्के फी घेतली जात आहे. ही बाब चुकीची असून, शाळा संचालकांनी फीमध्ये थोडी सवलत देण्याची गरज आहे. - कविता मेंढे, पालक

शाळा ऑनलाईन असल्या तरी खर्च येतोच मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद आहेत. त्यामुळे मागील वर्षीचे शैक्षणिक शुल्क अनेक पालकांनी भरले नाही. दीड वर्षांपासून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, भाडे आणि इतर आस्थापनांवरील खर्च संस्था चालकांना स्वत:च्या  खिशातूनच करावा लागत आहे. यामुळे अनेकांना तर कर्ज काढावे लागले. त्यामुळे शाळा ऑनलाईन असल्या तरी खर्च हा सुरूच आहे. - अनिल मंत्री, संस्था चालक दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरूच आहे. यासाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे लागत आहे. तर इतर खर्चसुद्धा सुरूच आहेत. त्यामुळे शाळा ऑफलाईन असल्या तरी खर्च मात्र सुरूच आहे. बऱ्याच शाळांनी पालकांना फी भरण्यासाठी सवलत दिली आहे. पालकांनीसुद्धा संस्थाचालकांची अडचण लक्षात घ्यावी. - मुकेश अग्रवाल, संस्था चालक.

ऑनलाईन शाळांमुळे  खर्चात बचतच- शाळा ऑनलाईन असल्याने विजेच्या तसेच इतर सोयी सुविधांवरील खर्चात बचत झाली आहे.- ऑनलाईन शिकविणाऱ्या शिक्षकांना केवळ अर्धा पगार दिले जात आहे. - स्कूल बसेस बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे कपात करण्यात आले आहेत. - प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर होणाऱ्या विविध खर्चाचीसुध्दा बचत झाली.  

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या