शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन यार्डात स्थानांतरण अटळ

By admin | Updated: May 4, 2017 00:55 IST

मोक्षधाम मार्गावरील २० एकर परिसरात नव्याने तयार झालेल्या स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड येथील

गोंदिया : मोक्षधाम मार्गावरील २० एकर परिसरात नव्याने तयार झालेल्या स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थानांतरण व्हावे अशी मागणी मागील काही वर्षापासून सुरु होती.त्या अनुसंगाने कोणत्याही परिस्थितीत ११ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थानांतरण नवीन मार्केट यार्डमध्ये करण्यात येईल, अशी माहिती सुरेशकुमार अग्रवाल यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. मोक्षधाम मार्गावर सावराटोलीला लागून असलेल्या २० एकर जागेवर २००१ मध्ये स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निधीअभावी हे यार्ड तयार होण्यास उशीर होऊ लागले. शेवटी २००९ मध्ये राष्ट्रीय कृषी समय विकास योजना व लोकसहभागाच्या माध्यमातून बाजार समिती तयार करण्यासाठी निधीला मंजूरी मिळाली व हे काम सुरू झाले. सध्यास्थितीत या यार्डमध्ये चार मोठे लिलाव शेड, प्रशासकीय इमारत, १५०० मेट्रिक टन क्षमता असलेले दोन गोडावून, ७७ व्यापारी गाडे, पोलीस चौकी यासह शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या निवासासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार, समितीच्या संचालक मंडळाने आज २ मे रोजी स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, व्यापारी अडतीया संघाच्या वतीने समस्यांचे कारण पुढे करून स्थानांतरणाला विरोध करण्यात आला. त्यातच बाजार समितीने २ मे रोजी स्थानांतरण करण्याचा मूहूर्त साधला होता. मात्र, समस्यांना घेऊन अडतीया व्यापारी संघटनेच्यावतीने त्याला विरोध करण्यात आला. त्यावर बाजार समिती संचालक मंडळाने समस्यांचे निराकरण त्वरित करून घेण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांसाठी हे स्थानांतरण थांबू नये, अशी भूमिका विद्यमान संचालक मंडळाने घेतली. कोणत्याही परिस्थिती ११ मे रोजी नवीन मार्केट यार्डमध्ये बाजार समितीचे स्थानांतरण होणार, अशी माहिती आयोजित पत्रपरिषदेत संचालक मंडळाने दिली. या विरोधात कालपासूनच सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडतीया व्यापारी संघाच्यावतीने धान खरेदी बंद केली आहे. संचालक मंडळाने शेतकऱ्यांना नवीन मार्केट यार्डमध्ये फ्री सेल सुरु करण्यात आले असून, आपले धान फ्री सेलमध्येच विकण्याचे आवाहन केले आहे. आयोजित पत्रपरिषदेत कृऊबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक सुरेशकुमार अग्रवाल, जगदीशप्रसाद अग्रवाल, अरुण दुबे, कुंदन कटारे, विठोबा लिल्हारे, पंकज यादव, तिर्थराज हरिणखेडे, आनंदराव तुरकर, मनोज दहीकर व इतर संचालक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)