शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर आली परिवहन महामंडळाला जाग

By admin | Updated: April 24, 2015 01:42 IST

देवरी ते कोहमारा डव्वा-गोरेगाव मार्गे गोंदियासाठी व परत याच मार्गे देवरीला येण्यासाठी बससेवा सुरू नव्हती.

गोंदिया : देवरी ते कोहमारा डव्वा-गोरेगाव मार्गे गोंदियासाठी व परत याच मार्गे देवरीला येण्यासाठी बससेवा सुरू नव्हती. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना खूप त्रास होत होता. या समस्या एसटी महामंडळाच्या निदर्शनास आणूण देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता नरेश जैन यांनी केलेल्या नऊ महिन्यांच्या संघर्षाला यश आले आहे. एसटी महामंडळाने आता १ एप्रिलपासून देवरी-गोंदिया व्हाया कोहमारा-डव्वा-गोरेगावमार्गे बससेवा सुरू केली आहे. सदर मार्गावर एकही बस धावत नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला होता. नरेश जैन यांनी ११ सप्टेंबर २०१४ रोजी विभाग नियंत्रक भंडारा यांना निवेदन दिले होते. १८ सप्टेंबरला आगार प्रमुख साकोली व गोंदिया यांनाही निवेदन दिले होते. २४ सप्टेंबर रोजी गोंदियाच्या आगार व्यवस्थापकांनी सदर बससेवा सुरू करण्याबाबत एक अहवाल विभाग नियंत्रक भंडारा यांना पाठविला होता. परंतु बससेवा सुरू करण्यात आली नाही. जैन यांनी विभागीय वाहतूक अधिकारी आदमने यांची भेट घेवून सदर बससेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या कार्यालयीन पत्रानुसार जैन यांना कळविण्यात आले की, गर्दीच्या दिवसात या मार्गावर प्रायोगिक तत्वावर बससेवा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही कार्यवाही पूर्ण होताच आपल्याला सांगण्यात येईल. परंतु सहा महिने लोटूनही एसटीने कार्यवाही केली नाही. विशेष म्हणजे दिवाळीच्या गर्दीच्या दिवसांत व त्यानंतरही प्रायोगिक तत्वावर बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जैन सदर बससेवा सुरू होण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते.१७ नोव्हेंबर रोजी जैन यांनी विभाग नियंत्रक भंडारा यांना पत्र लिहून सर्व समस्या सांगितल्या व सदर बससेवा का सुरू करण्यात आली नाही, याचे कारण विचारले. मात्र बससेवा सुरू न होण्यामागे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व त्यांचेच षडयंत्र असल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आमदारांशी चर्चानरेश जैन यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आ. संजय पुराम यांना भेटले व याबाबत माहिती दिली. २८ जानेवारी २०१५ रोजी आ. पुराम यांनी विभाग नियंत्रक भंडारा यांना एक पत्र देवून सदर बससेवा अविलंब सुरू करण्याची मागणी केली. याच्या एक महिन्यानंतरही बस सुरू करण्यात आली नाही. ही बाब जैन यांनी आ. पुराम यांच्या कानावर घातली. पुराम यांनी दुसरे पत्र लिहून विभाग नियंत्रकावर कारवाई करण्यात येईल, असे सांगताच एसटीचे अधिकारी झोपेतून जागे झाले व परिणामी १ एप्रिलपासून बससेवा सुरू करण्यात आली. पहिलीच फेरी मार्ग फलकाशिवायएसटीने नवीन शेड्युलची बस चालू न करता एक एप्रिल रोजी शेड्यूल क्रमांक-१०३ ची गोंदिया-फुक्कीमेटा-देवरी व्हाया कोहमारा-गोंदियासाठी १०.१५ वाजता बस सोडली. गोंदिया ते आमगाव फुक्कीमेटामार्गे देवरी येथे येऊन केवळ कोहमारामार्गे गोंदियासाठी देवरीवरून सोडण्यात आली. दरदिवशी ही बस फुक्कीमेटावरून देवरी व परत १०.१५ वाजता सरळ आमगावमार्गे गोंदियाला जात होती. त्यामुळे आमगावला जाणारे प्रवाशी हैरान झाले. त्या बसवर मार्गाचे फलकसुद्धा लावले नव्हते. याबाबत जैन यांनी प्रवाशांसह चालकाची विचारपूस केली. त्यावेळी ही बस कोहमारामार्गे गोंदियाला जाईल, असे सांगण्यात आल्यावर सर्वांना धक्काच लागला. कारण आमगावला जाण्यासाठी कोणतीही बस उपलब्ध नव्हती.