अभिनेता सलमान खान ९ फेब्रुवारीला गोंदियात

By Admin | Updated: February 6, 2016 01:47 IST2016-02-06T01:47:18+5:302016-02-06T01:47:18+5:30

गेल्या २५ वर्षांपासून युवा वर्गाच्या हृदयावर राज करणारा प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान येत्या ९ फेब्रुवारीला गोंदियात येणार आहे.

Actor Salman Khan on February 9 in Gondiya | अभिनेता सलमान खान ९ फेब्रुवारीला गोंदियात

अभिनेता सलमान खान ९ फेब्रुवारीला गोंदियात

मनोहरभाई जयंती : विद्यार्थ्यांचा सत्कार
गोंदिया : गेल्या २५ वर्षांपासून युवा वर्गाच्या हृदयावर राज करणारा प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान येत्या ९ फेब्रुवारीला गोंदियात येणार आहे. यावेळी तो आयुष्यातील आव्हाने व संकटांशी लढण्याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्याच्या हस्ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी खा.पटेल यांनीच सलमानला गोंदियात आणले होते.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा व्यापक करणारे शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारीला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर दुपारी १२.३० वाजता आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्ल पटेल राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, मिडीया गुरू सुहेल सेठ, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील.
गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृति समिती तथा मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. गेल्यावर्षी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकरच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याना गौरवित केले होते तर त्याआधी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाला होता.
या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आ.राजेंद्र जैन, माजी आ.हरिहरभाई पटेल यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Actor Salman Khan on February 9 in Gondiya