शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन व्यक्ती बाहेर आढळल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

केंद्र शासन व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाचे अनुषंगाने जिल्ह्यातील मूळ रहिवासी जे इतर राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या काळात अडकलेले आहेत अशा मजूर, यात्रेकरु, सामान्य नागरिक व इतरांना त्यांच्या स्वजिल्ह्यात परत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना माहिती द्यावी । उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने अंमलबजावणी व कार्यवाही सुरु असून प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ दरम्यान प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शिवाय परराज्य व जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले जात असून ते बाहेर फिरताना आढळून येत आहेत. अशांवर आता कारवाई केली जाणार असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी काढले असून नागरिकांनाही कुणी दिसून आल्यास माहिती द्यावी असे त्यांनी कळविले आहे.केंद्र शासन व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाचे अनुषंगाने जिल्ह्यातील मूळ रहिवासी जे इतर राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या काळात अडकलेले आहेत अशा मजूर, यात्रेकरु, सामान्य नागरिक व इतरांना त्यांच्या स्वजिल्ह्यात परत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.परराज्य व जिल्ह्यातून गोंदिया तालुक्यात नागरी तसेच ग्रामीण भागात परत येणारे व्यक्ती, मजूर, यात्रेकरु, सामान्य नागरिक व इतरांपैकी काही व्यक्ती होम क्वारंटाईन नियमाचे पालन न करता गाव व शहरात इतरत्र फिरत असल्याचे निदर्शनास आले असून याबाबतच्या तक्रारी सुद्धा प्राप्त होत आहेत.अशा व्यक्तींनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व बाहेर इतरत्र फिरताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करुन भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येणार असे उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांनी कळविले आहे.प्रशासनाला सहकार्य करापरराज्य व जिल्ह्यातून आलेली व्यक्ती क्वारंटाईन नियमांचे भंग करुन परिसरात फिरताना आढळून आल्यास त्याबाबत संबंधित पोलीस ठाणे, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, नगर परिषद मुुख्याधिकारी, ग्रामपंचायत सचिव व स्थानिक आरोग्य विभागाला त्वरीत सूचना द्यावी व कोविड विषाणूचा संसर्ग टाळण्यास प्रशासनास सहकार्य करावे असे उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांनी कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या