शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर जनावरे बांधणार्‍यांवर कारवाई शून्य

By admin | Updated: June 8, 2014 23:57 IST

भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश आहेत. परंतु तालुक्यात आजपर्यंत यासंदर्भात एकही गुन्हा दाखल

दिलीप चव्हाण - गोरेगाव
भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश आहेत. परंतु तालुक्यात आजपर्यंत यासंदर्भात एकही गुन्हा दाखल झाला नाही अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील पशुपालक रस्त्यावरच जनावरे बांधतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. हा बेकायदेशीर अतिक्रमणाचा प्रकार आहे. या प्रकरणातील पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला शासन आदेशाचा विसर पडला आहे.
राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खचरून ग्रामीण नागरिकांच्या सोईसाठी रस्ते तयार केले. मात्र पशुपालकांनी रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. अशा पशुपालकांवर ग्रामपंचायत प्रशासनाने प्रथम नोटीस बजावून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करायला पाहिजे. मात्र आजपर्यंत तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत प्रशासनाने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात धाडस दाखविले नाही.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करण्यात येतो. दहा वर्षापूर्वी गावरस्त्यांची अवस्था दयनिय होती. आज गल्लोगल्ली विविध योजनेतून कांक्रीट रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. परंतु या रस्त्याचा उपयोग आता पशूपालक गाय, म्हैस, बैल, शेळी बांधकामाकरिता करीत असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे गावात जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला खुंट्याला जनावरे बांधलेली असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी या रस्त्याने चालने अवघड झाले आहे. अनेकवेळा या रस्त्यावर दुचाकी चालकांचे अपघात झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सिमेंट रस्त्यावर जनावरे बांधले जातात. याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.