शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आठ कामांसाठी ८० लाख मंजूर करा

By admin | Updated: November 2, 2015 01:29 IST

तिरोडा विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणण्याचा ध्यास घेतलेले आ. विजय रहांगडाले यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष घातले असून बेरोजगारी कशी दूर होईल, यावर भर दिला आहे. ..

पर्यटन विकास : विजय रहांगडाले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्रतिरोडा : तिरोडा विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणण्याचा ध्यास घेतलेले आ. विजय रहांगडाले यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष घातले असून बेरोजगारी कशी दूर होईल, यावर भर दिला आहे. त्यानिमित्त तिरोडा विधानसभा क्षेत्रातील आठ कामे प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळावी, यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना पत्र लिहिले आहे.पर्यटन क्षेत्राचा विकास झाल्यास तरुणांना काम मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासाठी चोरखमारा येथे पर्यटन स्थळांना जलाशयापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण दहा लाख, शौचालय पेन्टींग ब्लॉक व सुशोभीेकरण दहा लाख, सभामंडप सौंदर्यीकरण-शौचालय दहा लाख, बोदलकसा पेव्हींग ब्लॉक व सुशोभीकरण १० लाख, बोलदकसा जलाशय निरीक्षण गृह पर्यटन विभागाने मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता डांबरीकरण दहा लाख, केरझरा पर्यटन स्थळ ते पांढरी सिमेंट रस्ता भाग-१ १० लाख, केरझरा पर्यटन स्थळ ते पांगडी सिमेंट रस्ता भाग-२ १० लाख, काशीघाट सौंदर्यीकरण व संरक्षण भिंत १० लाख, असे एकूण ८० लाखांच्या कामांना मंजुरीसाठी आ. विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र लिहले आहे.सदर कामे मंजूर झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण, सुविधा व बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. (शहर प्रतिनिधी)