शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कुटुंब योजनेत ३ वर्षांत ५५ लाभार्थी

By admin | Updated: November 9, 2014 22:32 IST

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोमर्यादा असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते. १८ आॅक्टोबर २०१२ पासून सदर योजना सुरु असून या योजनेतील निकष बदलविण्यात आले.

दिलीप चव्हाण - गोरेगावराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोमर्यादा असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते. १८ आॅक्टोबर २०१२ पासून सदर योजना सुरु असून या योजनेतील निकष बदलविण्यात आले. या योजनेत लाभार्थ्यांना २० हजार लाभ दिला जातो. या योजनेचा आजपर्यंत ५५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.जनतेमध्ये शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, त्यांना योजनांचा लाभ तत्काळ मिळावा या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या जनजागृती अभावी सदर योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही.विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना या योजना चालविल्या जातात. या सर्व योजना स्थानिक पातळीवर महसूली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पटवारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावे लागते. निकषात बसणाऱ्या अर्जदारास योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून लाभार्थी निकषात बसतो किंवा नाही, त्यानुसार निर्णय घेतले जाते. मात्र शासनाच्या या योजना जनजागृती अभावी रखडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.शासनाच्या वरील सर्व योजनाचा लाभ बँक, पोस्ट आॅफीसच्या माध्यमातून दिला जातो. या सर्व योजनेतून मिळणारा लाभ केंद्रशासन व राज्य शासनाकडून दिला जातो. शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ६५ वर्षावरील २१ हजाराच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकाला लाभ घेता येतो. या योजनेत ६०० रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन देता येते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट ब) मधून ४०० रुपये व केंद्र शासनाकडून २०० रुपये असे एकूण ६०० रुपये प्रतिमहिना लाभार्थ्यांना दिले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत ६० ते ६५ वर्षावरील दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती पात्र ठरतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत ४० ते ४५ वर्षापेक्षा कमी वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील विधवा योजनेत पात्र ठरतात. या योजनेच्या माध्यमातून ६०० रुपये दरमहा दिले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेत ८० टक्के पेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालील १८ ते ६५ वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र शासन व राज्य सरकारकडून ६०० रुपये निवृत्तीवेतन देण्यात येतो.