शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार बालके अंगणवाडीपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना व ६ वर्षातील बालकांना महिला बालविकास विभागाकडून सकस आहार व विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका बालकांची व गर्भवतींची नोंदणी बरोबर करून त्यांना सर्व सोयी सुविधांचा लाभ देण्यात येतो. परंतु गोंदिया आणि तिरोडा या दोन शहरातील गर्भवतींना व लहान बालकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

ठळक मुद्देप्रकल्प अधिकाऱ्याची कबुली । गोंदिया व तिरोडा येथे सर्वेक्षणच नाही

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरगरिबांच्या मुलांना लहानपणापासून शिक्षणाची गोडी लागावी व त्यांचे आनंददायीपणातून शिक्षण व्हावे यासाठी शासनाने चिमुकल्यांसाठी अंगणवाडीची सोय केली. ग्रामीण भागात ह्या अंगणवाड्यांतून बालकांना व गर्भवतींना उत्तम सेवा प्रदान केली जाते, परंतु शहरी भागातील हजारो बालकांना अंगणवाडीपासून दूर ठेवले जात आहे. स्वत: शहरांसाठी असलेले बाल विकास प्रकल्प विभाग उदासीन असल्यामुळे गोंदिया व तिरोडा या दोन शहरातील पाच हजार बालके अंगणवाडीपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्ह्यात आठ तालुक्यातील बहुतांश भाग ग्रामीण आहे. ग्रामीण भागातील अंगणवाड्या सांभाळणाऱ्या यंत्रणा अत्यंत सक्षम दिसून येत आहेत. परंतु त्यातच गोंदिया व तिरोडा हे दोन शहर सांभाळणाऱ्या यंत्रणेची वाताहत होत असल्याचे चित्र आहे.गोंदिया शहरात व तिरोडा शहरात असलेल्या गोरगरीबांची ५ हजार बालके आंगणवाडीपासून वंचित आहेत. शहराचे महिला बाल प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर यांनी ५ हजार बालके अंगणवाडीपासून वंचीत असल्याची कबुली देत सर्वेक्षण करू आणि नवीन अंगणवाड्यांचा प्रस्ताव आयुक्तांना पाठविणार असल्याचे सांगितले.ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना व ६ वर्षातील बालकांना महिला बालविकास विभागाकडून सकस आहार व विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका बालकांची व गर्भवतींची नोंदणी बरोबर करून त्यांना सर्व सोयी सुविधांचा लाभ देण्यात येतो. परंतु गोंदिया आणि तिरोडा या दोन शहरातील गर्भवतींना व लहान बालकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.एखादी गर्भवती महिला नोंदणीसाठी अंगणवाडीत गेल्यावर तू आमच्या अंगणवाडीच्या परिसरात येत नाहीस, आमची संख्या पूर्ण झाली आहे, असे विविध कारण सांगून त्यांचे नाव नोंदविण्याचे टाळून त्यांना योजनेपासून दूर ठेवले जात आहेत.आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपलीज्या गर्भवती किंवा बालकांची नावे अंगणवाडीच्या यादीत नाहीत त्यांचे त्वरीत सर्वेक्षण घेऊन नवीन अंगणवाडीचा प्रस्ताव सादर करावा असे पत्र आयुक्तांनी सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. परंतु आयुक्तांच्या पत्राकडेही बालविकास प्रकल्प कार्यालयाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.अनेक वर्षापासून सर्वेक्षणच नाहीदरवर्षी एप्रिल महिन्यात गर्भवती महिला व लहान बालकांचे सर्वेक्षण केले जाते. गरजेनुसार अंगणवाडी मंजूर करून गोरगरीबांना महिला बाल कल्याणण विभागाचा लाभ देण्यात येतो. परंतु गोंदिया व तिरोडा या दोन शहरातील तब्बल पाच हजार बालकांना अंगणवाडीपासून दूर ठेवण्यात आले.जबाबदारी झटकतातआपल्या परिसरातील अंगणवाडीमध्ये गर्भवती महिलांची नोंदणी करण्यासाठी काही अंगणवाडी सेविकाच तयार नाहीत. गर्भवती महिला त्यांच्याकडे गेल्यास तुमचा परिसर आमच्या अंगणवाडीत येत नाही. आमच्या अंगणवाडीची संख्या पूर्ण झाली आहे असे बोलून टाळाटाळ करतात.नवीन सर्वेक्षण करण्याचे आयुक्तांचे पत्र आहे. परंतु कोरोनामुळे सर्वेक्षण उशीरा झाले. एप्रिलमध्ये सर्वेक्षण करायचे होते. गोंदिया व तिरोडा या दोन शहरात ५ हजार लाभार्थी वंचित आहेत.-तुषार पवनीकर, प्रकल्प अधिकारीमहिला बाल कल्याण विभाग, गोंदिया शहर

टॅग्स :Schoolशाळा