शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटीचे चुकारे आले ४१ कोटीचे शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेमुळे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र धान खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला १०० कोटी रुपयांचा निधी दुसरीकडे वळविण्यात आल्याने ही अडचण निर्माण झाल्याची बाब पुढे आली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १२ डिसेंबरपर्यंत एकूण ५ लाख क्विंटल धानाची खरेदी केली असून खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ९१ कोटी ७० लाख ५० हजार रुपये एवढी आहे.

ठळक मुद्दे५ लाख क्विंटल धान खरेदी : १९ हजार शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यधी रूपयांचे धानाचे चुकारे थकले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शासनाने दोन टप्प्यात ५० कोटी रुपयांचा निधी चुकारे करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करुन दिला आहे. पण यानंतरही ४१ कोटी रुपयांचे चुकारे थकीत असल्याने शेतकरी वेटींगवर असल्याचे चित्र आहे.खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ६५ केंद्रावरुन ४ नोव्हेंबरपासून सुरूवात केली. मात्र खरेदी केंद्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटूनही खरेदी केलेल्या धानासाठी निधी उपलब्ध करुन न देण्यात आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. तर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेमुळे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र धान खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला १०० कोटी रुपयांचा निधी दुसरीकडे वळविण्यात आल्याने ही अडचण निर्माण झाल्याची बाब पुढे आली.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १२ डिसेंबरपर्यंत एकूण ५ लाख क्विंटल धानाची खरेदी केली असून खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ९१ कोटी ७० लाख ५० हजार रुपये एवढी आहे.यापैकी आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून ४१ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांचे धानाचे चुकारे थकले आहे. खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत १९ हजार ४०० शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. पण, चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वांरवार शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.यासंदर्भात फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संर्पक साधला असता त्यांनी शासनाकडून आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी दोन तीन दिवसात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.बारदाना शेतकऱ्यांसाठी नव्हे व्यापाऱ्यांसाठीशासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी फेडरेशनकडून बारदाना दिला जात नसल्याने शेतकºयांना बाजारपेठेतून बारदाना खरेदीचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी म्हणून दोन लाख बारदाना उपलब्ध करुन देण्यात आला.मात्र फेडरेशनकडून हा बारदाना शेतकऱ्यांसाठी नव्हे तर धानाची भरडाई करण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्याची मागणी केली जात आहे.बोनसचे आदेश पोहचलेशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. यासंबंधिचे आदेश गुरूवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १८३५ अधिक बोनसचे ५०० असा एकूण २३३५ रुपये प्रती क्विंटल दर मिळणार आहे.भरडाईच्या प्रती क्विंटल दरात प्रथमच वाढशासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. यासाठी केंद्र शासनाने पूर्वी १० रुपये प्रती क्विंटल भरडाईचे दर निश्चित केले होते. मात्र हे दर फार कमी असून यामुळे राईस मिलर्सचे नुकसान होत असल्याची बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यात प्रथमच वाढ केली असून भरडाईसाठी राज्य सरकार ३० रुपये प्रती क्विंटल अतिरिक्त देणार आहे. त्यामुळे राईस मिलर्सना आता प्रती क्विंटल धान भरडाईसाठी ४० रुपये मिळणार आहे. यासंबंधिचे आदेश सुध्दा जिल्हाधिकारी कार्यालयाला गुरूवारी प्राप्त झाले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड