शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

४९६ उमेदवारांची पोलीस भरतीला दांडी

By admin | Updated: June 9, 2014 23:40 IST

जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी होत असलेली पोलीस भरती तीव्र ऊन्हात होत असल्याने याचा तडाखा भरतीसाठी येणार्‍या घेण्यात येत असल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे ४९३ उमेदवार मागील चार

अपात्रतेचा फटका : उन्हापासून बचावासाठी उपाययोजना
गोंदिया : जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी होत असलेली पोलीस भरती तीव्र ऊन्हात होत असल्याने याचा तडाखा भरतीसाठी येणार्‍या घेण्यात येत असल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे ४९३ उमेदवार मागील चार दिवसात गैरहजर राहिले आहेत. याशिवाय तीन दिवसात २८३ उमेदवार शारीरिक चाचणीत व कागदपत्र तपासणीत अपात्र ठरले आहेत. दरम्यान उमेदवारांना उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी पोलीस विभागातर्फे अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ७६ पोलीस शिपाई पदासाठी होत असलेल्या भरतीची शारीरिक चाचणी ६ जूनपासून सुरू करण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी दररोज विशिष्ट उमेदवारांना बोलाविण्यात आले. पहिल्या दिवशी बोलविलेल्या ३00 उमेदवारांपैकी १४0 उमेदवार गैरहजर राहीले. हजर असलेल्यांपैकी ६५ जण अपात्र तर ८0 उमेदवार पात्र ठरले आहेत.
यातील १५ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी १४ रोजी बोलाविण्यात आले. ७ जून रोजी ४५0 उमेद्वारांना बोलाविले होते. यातील ३१४ उमेदवार हजर तर १३६ उमेदवार गैरहजर राहीले. त्यैपीक ११८ उमेदवार अपात्र ठरले. यातील २0 उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी १४ रोजी बोलाविण्यात आले आहे.
८ जूनला ५00 उमेद्वारांना बोलाविले होते. यातील ९९ उमेदवार गैरहजर राहीले. हजर असलेल्यांपैकी १00 उमेदवार अपात्र ठरले. यातील १४ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी १४ रोजी बोलाविण्यात आले आहे. ९ जूनला रोजी ६00 उमेद्वारांना बोलाविले होते. यातील ११८ उमेदवार गैरहजर राहीले. हजर असलेल्यांची पाच किमी धावण्याची चाचणी मंगळवारी पहाटे ५ वाजतादरम्यान घेण्यात येणार आहे.
उन्हाच्या तडाख्यापासून उमेदवारांचा बचाव व्हावा यासाठी मुख्यालयाच्या मैदानावर शामियान्याची संख्या वाढविण्यात आली आहे. सोबतच वैद्यकीय चमू ठेवण्यात आली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा गोंदिया जिल्हयातील दूर अंतरावरून आलेल्या उमेदवारांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांच्यासाठी राहण्याची सोय पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पोलीस मुख्यालयाच्या बॅरेकमध्ये केली आहे. उन्हापासून बचाव म्हणून शारीरिक चाचणी देणार्‍यांसाठी ग्लुकोज, पाणी व इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)