शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

४१ वर्षांनंतर पंतप्रधान गोंदियात

By admin | Updated: October 4, 2014 23:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ५ आॅक्टोबर रोजी गोंदियात जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक इंदिरा गांधी स्टेडीयम येथे सायंकाळी ५.३५ वाजता मोदी यांचे भाषण होणार आहे.

दोन हजारावर पोलीस : सहा जिल्ह्यातून आले १७०० अधिकारी-कर्मचारीगोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ५ आॅक्टोबर रोजी गोंदियात जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक इंदिरा गांधी स्टेडीयम येथे सायंकाळी ५.३५ वाजता मोदी यांचे भाषण होणार आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून गोंदियात येत असलेले नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान आहेत. तब्बल ४१ वर्षानंतर गोंदिया पंतप्रधानांचे आगमन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.यापूर्वी ९ फेब्रुवारी १९७१ रोजी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार स्व. ज्वालाप्रसाद दुबे यांच्या प्रचारासाठी गोंदिया नगर परिषद मैदानावर पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. १९५१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी लोकसभेचे उमेदवार स्व.चतुर्भूज जसानी तर विधानसभेचे उमेदवार स्व. मनोहरभाई पटेल होते. १९७१ नंतर कोणीही पंतप्रधान गोंदियात आले नाही. त्यामुळे गोंदियात येत असलेले मोदी हे तिसरे प्रधानमंत्री असल्याची माहिती स्वातंत्र्य संग्राम सेनानी व माजी मंत्री केवलचंद जैन यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात येत आहे. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण येथून १७०० कर्मचारी, अधिकारी मागविण्यात आले आहे. सोबतच सी-६० च्या सात पाटर्या, एक एसआरपी कंपनी, दिल्ली येथील पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा पथक, नागपूर येथील विशेष सुरक्षा विभागाचे अधिकारी, एक पोलीस उपायुक्त, तीन अतिरीक्त पोलीस अधिक्षक, ८ उपविभागीय पोलीस अधिकारी, ९ पोलीस निरीक्षक, ५० सहायक पोलीस निरीक्षक व ८ महिला अधिकारी बंदोबस्तात राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात राहणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)पंतप्रधानांसाठी हे मार्ग राहणार बंदपंतप्रधान सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी स्टेडियम येथे येत असल्याने वाहतुक नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने अनेक रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यात बालाघाटकडून गोेंदियाकडे येणारी जड वाहने मुरपार चेकपोस्टपासून रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत उभी राहतील. तिरोडा ते गोंदियाकडे येणारी जड वाहने गंगाझरीपासून रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत उभे राहतील. आमगावकडून गोंदियाकडे येणारी जड वाहने खमारीपासून रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत उभे राहतील. गोरेगावकडून गोंदियाकडे येणारी जड वाहन पोलीस ठाणे गोरेगावपासून एका रांगेत उभे राहतील. कामठाकडून रावणवाडीकडे येणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात आली आहे. जयस्तंभ चौकातून बालाघाट, तिरोडाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. फक्त चारचाकी वाहनेमाटन मार्केट, भूमाीगत पूल, कुडवानाका मार्गे जातील. गर्ल्स महाविद्यालयाकडून आंबेडकर चाौकात येणारी संपुर्ण वाहतुक, न्यायालयाकडून आंबेडकर चौकाकडे येणारी सर्व वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. गोरेलाल चौकातून नेहरू चौकाकडे, श्री टॉकीज कडून जयभोले स्पेअर पार्टकडे, सिव्हील लाईनकडून नेहरू चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनकडून मनोहर म्युनिसिपल शाळेकडे, डाकघराकडून गंगाबाई रूग्णालयाकडे येणारी सर्व वाहतूक बंद राहील.