शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

३७६ जण ‘रेफर टू गंगाबाई’

By admin | Updated: November 3, 2015 02:20 IST

बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून

गोंदिया : बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून सुटण्याची संधी मिळते. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत बलात्कारपीडित तरूणी, महिलांची तपासणी न करता त्यांना ‘रेफर टू गंगाबाई’ केले जात आहे.पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी स्त्री रोग तज्ज्ञाकडून व्हावी असा नियम नाही. महिला डॉक्टर उपलब्ध असल्यास त्या डॉक्टरला आधी प्राधान्य दिले जाते. परंतु महिला डॉक्टर नसले तरी कोणतेही एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीतेची वैद्यकीय चाचणी करू शकतात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. परंतु याबाबतची माहिती डॉक्टरांना आहे की नाही, अशी शंका येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील एमबीबीएस डॉक्टर त्या पीडितांची वैद्यकीय तपासणी न करता महिला डॉक्टर किंवा स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याचे कारण दाखवून त्यांना सरळ गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रूग्णालयात रेफर करतात. डॉ.रंजना पारधी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ४६/२०१० मध्ये जनहित याचीका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर राज्य शासनाने १० मे २०१३ रोजी एक पत्र काढून कोणताही एमबीबीएस डॉक्टर कलम ३७६ च्या प्रकरणात पिडीतांची वैद्यकीय चाचणी करू शकतो असे नमूद करण्यात आले आहे. हा नियम महाराष्ट्रात सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने हा नियम देशभरात लागू केला. ७ आॅगस्ट २०१५ रोजी केंद्र शासनाने सर्व समावेशक परिपत्रक काढून सर्व आरोग्य यंत्रणांना दिले, तरी देखील जिल्ह्यातील बहुतांश एमबीबीएस डॉक्टर त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. एखादा पुरूष एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीत महिलेची तपासणी करीत असेल त्यावेळी त्या ठिकाणी त्या पिडीतेची एखादी नातेवाईक महिला उपस्थित राहणे गरजेचे आहे. जर एखाद्या रूग्णालयात महिला डॉक्टर असतील तर त्यांची तपासणी त्यांनीच करावी. परंतु तसे होताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)पोलीसही अनभिज्ञबलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी कोणत्याही एमबीबीएस डॉक्टरला करता येणार हे पत्रक आरोग्य यंत्रणांना मिळाले. परंतु त्या पत्रकाची माहिती पोलीस यंत्रणेला नसल्यामुळे रूग्णालयातील डॉक्टर त्यांना स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून त्यांची दिशाभूल करतात. पोलिसांना या पत्रकाची माहिती नसल्यामुळे हे सर्व चालत आहे.४ पीडित महिलांची वेळेत तपासणी गरजेची असते. वैद्यकीय चाचणीत जेवढा उशीर होईल तेवढीच आरोपींना सुटण्याची संधी मिळते. एमबीबीएस डॉक्टर त्यांची वेळेत तपासणी करीत नसल्यामुळे त्यांची चाचणी करण्यास उशीर होते. प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरने बलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. त्या प्रकरणात उशीर झाल्यास आरोपींना सुटण्याची संधी मिळते. या प्रकरणात वेळेला महत्व आहे.-डॉ. संजीव दोडके अधीक्षक बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया