शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

३५२ बालकांना रोजगार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:51 IST

पूर्व विदर्भातील केवळ गोंदिया जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने शिक्षण सोडून ....

गोंदिया : पूर्व विदर्भातील केवळ गोंदिया जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने शिक्षण सोडून जीवनापासून निराश झालेल्या एक हजार ६२१ बालकांच्या जीवनात आनंद भरला. यापैकी अनेक मुले आता शहाणे होवून आपल्या पायावर उभे होवून स्वावलंबनाचे जीवन गजत आहेत. तसेच आता त्यांनी सकारात्मक दृष्टिकोण ठेवून आपल्या कुटुंबाची आधारशक्ती ठरले आहेत.सन २००२-०३ दरम्यान आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यात श्रमिकांच्या शिक्षण सोडलेल्या बालकांना पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली. ज्या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली त्यात विदर्भातील अमरावती व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात त्यावेळी मोठ्या संख्येत बीडी कारखाने बाकीच होते. त्यामुळे धोकादायक उद्योगात कार्यरत श्रमिकांच्या बालकांसाठी विशेष शिक्षण-प्रशिक्षण केंद्र उघडण्याची योजना होती. त्यावेळी गोंदिया जिल्ह्यात ४० विशेष शिक्षण प्रशिक्षण केंद्र उघडण्याची मंजुरी मिळाली. परंतु एवढे शिक्षण केंद्र उघडण्यात आले नाही. नंतर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने या योजनांपासून आपले हात काढून घेतले. यानंतरही श्रम व रोजगार मंत्रालयाने सदर प्रोजेक्ट सुरूच ठेवले. सन २००६-०७ त सन २०१५-१६ पर्यंत एक हजार ६२१ बालके विशेष शिक्षण केंद्राच्या माध्यमाने शिक्षणाच्या मूळ प्रवाहात जुडले. सन २०१६ मध्ये शाळाबाह्य बालकांचा एक सर्व्हेक्षण करण्यात आला. यात नऊ ते १३ वर्षे वयोगटातील २३२ व १४ ते १८ वर्षे वयोगटातील ३५२ मुले शाळा सोडून इकडेतिकडे भटकताना आढळले. नऊ ते१४ वर्षे वयोगटातील २३२ बालकांसाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय नवी दिल्लीला सात नवीन विशेष शिक्षण-प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाच्या आधारावर सात नवीन शिक्षण केंद्र लवकरच सुरू केले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात आधीपासूनच १२ विशेष प्रशिक्षण केंद्र चालविले जात आहेत. यात शिक्षण सोडलेल्या ३८६ मुलांना विशेष पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे.सर्व्हेक्षणात आढळलेल्या १४ ते १८ वर्षे वयोगटातील ३५२ शाळाबाह्य मुलांना रोजगाराचे प्रशिक्षऽ देवून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याच्या दृष्टिनेसुद्धा एक प्रस्ताव बनविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा कौशल्य व विकास विभागाला पाठविण्यात आला आहे. यावर सकारात्मक पाऊल उचलण्यात आले तर सदर बलकांना रोजगाराचे प्रशिक्षण देवून त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला जावू शकतो. (प्रतिनिधी)५०.७६ लाखांचा खर्चगोंदिया जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने वार्षिक ५०.७६ लाख रूपये उपलब्ध करून दिले जात आहे. या निधीतून विशेष शिक्षण केंद्रात अध्ययनरत विद्यार्थ्यांना पुस्तके, बॅग उपलब्ध करून दिले जाते. केंद्राचे भाडेसुद्धा दिले जाते. कार्यालय व केंद्रात २४ कर्मचारी सेवा देत आहेत. त्यांचे वेतनसुद्धा याच निधीतून काढले जाते.शिष्यवृत्ती व दुपारचे भोजनविशेष शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून व शिष्यवृत्तीची रक्कम गोंदिया जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून प्रदान केली जाते. यावर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.विशेष प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दोन वर्षांपर्यंत प्रशिक्षण दिल्यानंतर मुलांना त्यांच्या वयानुसार जवळील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश करून दिला जातो. बालकांचा शोध घेणे, त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करणे व नंतर त्याने नियमित शिक्षण ग्रहण करावे, यासाठीच आमचा प्रयत्न आहे.-महेंद्र रंगारी,प्रोजेक्ट डायरेक्टर,राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समिती, गोंदिया.