शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार शेतकरी चुकऱ्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

जवळपास ६०० कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली असून यापैकी ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १५ हजार शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांचे धानाचे चुकारे थकले आहेत.

ठळक मुद्दे१०० कोटी रुपयांची गरज : शासनाकडून निधी न मिळाल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया जिल्ह्यातील १५ हजारावर शेतकऱ्यांचे धानाचे १०० कोटी रुपयांचे चुकारे मागील दोन महिन्यापासून थकले आहेत. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून खरीप हंगाम तोंडावर असताना तयारी कशी करायची अशी समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण ७० शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावानुसार धान खरेदी करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ३५ लाख क्विंटल धानाची खरेदी केली.जवळपास ६०० कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली असून यापैकी ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १५ हजार शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांचे धानाचे चुकारे थकले आहेत.चुकाºयाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात असल्याने शेतकरी चुकारे जमा झाले का म्हणून मागील दोन महिन्यापासून बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र प्रत्येकवेळी त्यांना निराश होवूनच परतावे लागत आहे.खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. अशात हंगामपूर्व मशागतीची कामे आणि खते, बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे.यासाठीच शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची लवकर विक्री केली. मात्र आता त्यांना त्यांच्यात शेतमालाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे.यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शासनाकडे निधीची मागणी केली आहे. येत्या आठवडाभरात निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. निधी प्राप्त होताच तो शेतकºयांच्या खात्यावर जमा केला जाईल असे सांगितले.२६ लाख क्विंटल धानाची भरडाई पूर्णजिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरीप हंगामात एकूण ३५ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई करुन तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. यापैकी आत्तापर्यंत २६ लाख क्विंटल धानाची भरडाई पूर्ण झाल्याची माहिती आहे.रब्बीत १५ लाख क्विंटल धान खरेदीचा अंदाजजिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी ७० शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी केली जाणार आहे. रब्बीत जवळपास १५ लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी