शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

१२ झाले बरे तर २२ रुग्णांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात रविवारी (दि.२) एकाच दिवशी रेकार्ड ब्रेक ६० कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा २२ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा १५६ वर पोहचला आहे. तर सोमवारी १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २४२ वर पोहचला आहे.

ठळक मुद्देगोंदियात वाढले रुग्ण : ९१८५ स्वॅन नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून सोमवारी (दि.३) जिल्ह्यात पुन्हा २२ रुग्णांची भर पडली.यात सर्वाधिक १५ रूग्ण हे गोंदिया येथील आहे. त्यामुळे गोंदिया शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात रविवारी (दि.२) एकाच दिवशी रेकार्ड ब्रेक ६० कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा २२ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा १५६ वर पोहचला आहे. तर सोमवारी १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २४२ वर पोहचला आहे. सोमवारी आढळलेल्या २२ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील १५ रुग्णांचा समावेश आहे. यात सिंधी कॉलनी ९, हनुमाननगर १, श्रीनगर १, रेलटोली १, दोन रुग्ण हे सिंगापूर आणि बिहार येथून आले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे २, सालेकसा १, देवरी २, तिरोडा १ आणि आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध १ अशा एकूण २२ रुग्णांचा समावेश आहे. मागील तीन दिवसांपासून गोंदिया शहरातील कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने शहरवासीयांनी काळजी घेण्याची गरज आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत प्रयोगशाळेत एकूण ९८०७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात ४०८ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.तर ९१८५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ९४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर १३८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही अनिश्चित आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट घेतल्या जात आहे. यातंर्गत आतापर्यंत २५७९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर २५५५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.नागरिकांनो घ्या स्वत:ची काळजीमागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

देवरी शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनामागील तीन चार दिवसांपासून देवरी येथे कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. देवरी येथील बाजारपेठ गुरूवार, शुक्रवार आणि मंगळवारी पूर्ण दिवसभर बंद राहणार आहे.तर इतर दिवशी बाजारपेठ सकाळी ९ ते दुपारी या कालावधीत सुरू राहणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या