शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११७ संस्था बंद

By admin | Updated: October 24, 2015 01:47 IST

सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली.

सहकारी संस्थेचे सर्वेक्षण : ९५४ सहकारी संस्था सुरूगोंदिया : सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली. या सर्वेक्षणासाठी ज्या संस्था त्यांच्या पत्यावर नाहीत व केवळ कागदोपत्री त्या संस्था सुरू आहेत, अनेक वर्षे ज्या संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही अशा संस्थांचे अतिस्त्व संपविण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर अवसायनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेनुसार मार्च २०१५ अखेर एकूण १ हजार ९८ सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी एक संस्था सर्वेक्षणापूर्वी अवसायनात निघालेली आहे. उरलेल्या १ हजार ९७ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार व लेखापरीक्षण विभागातील ३२ कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने संस्था सर्वेक्षणाची कार्यवाही संस्थांना प्रत्यक्ष भेटी देवून पूर्ण करण्यात आली.या सर्वेक्षणानुसार गोंदिया तालुक्यात २६०, तिरोडा १८२, गोरेगाव १५४, आमगाव १२७, सालेकसा ४९, देवरी व सडक अर्जुनी १४०, अर्जुनी मोरगाव १००, तसेच जिल्हास्तरावरील ४० अशा एकूण १ हजार ९७ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी बंद असलेल्या संस्थांमध्ये गोंदिया ४१, तिरोडा ४२, गोरेगाव ६०, आमगाव ९, सालेकसा निरंक, देवरी/सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव १३, जिल्हास्तरावरील निरंक अशा एकूण ११७ संस्था बंद असल्याचे सर्वेक्षणाअंती निदर्शनास आले. कार्य स्थगित करण्यात आलेल्या संस्थांमध्ये गोंदिया २, गोेरेगाव ८, सालेकसा ३ अशा एकूण १३ संस्थांचा समावेश आहे. ज्या संस्थांचा ठावठिकाणा लागलेला नाही अशा गोंदिया तालुक्यातील २, गोरेगाव ८, आमगाव ३ अशा १३ संस्था आहेत.बंद असलेल्या १४३ सहकारी संस्थांना सहकार अधिनियमातील तरतूदीनुसार अवसायनात घेण्याकरिता अंतिमपूर्वक नोटीस देण्यात आलेले आहे. सदर संस्थांना कलवकरच अवसायनात आणून या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)