मेटॅडोर उलटून ११ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:18+5:30

प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि.३) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास गोंदियावरून आमगावकरिता भाजीपाला घेऊन मेटॅडोर क्रमांक एमएच ३५-एजे १५७० वाहन चालक जितू अशोक पाथोडे घेऊन येत होता. दरम्यान अदासी-दहेगाव मार्गावरून पायी जाणाऱ्या मजुरांनी त्याच्या वाहनाला हात दाखविले. त्याने माणुसकीच्या नात्याने त्या १० मजुरांना आपल्या गाडीत बसविले.

11 injured as matador overturns | मेटॅडोर उलटून ११ जण जखमी

मेटॅडोर उलटून ११ जण जखमी

ठळक मुद्देआमगाव- गोंदिया मार्गावरील घटना : जखमींवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : गोंदियावरून भाजीपाला घेऊन येणारा मेटॅडोर उलटून ११ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.३) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आमगाव-गोंदिया मार्गावरील ग्राम ठाणा गावाजवळ घडली. जखमींमध्ये एक गर्भवती महिला व एका बालिकेचा समावेश आहे. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि.३) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास गोंदियावरून आमगावकरिता भाजीपाला घेऊन मेटॅडोर क्रमांक एमएच ३५-एजे १५७० वाहन चालक जितू अशोक पाथोडे घेऊन येत होता. दरम्यान अदासी-दहेगाव मार्गावरून पायी जाणाऱ्या मजुरांनी त्याच्या वाहनाला हात दाखविले. त्याने माणुसकीच्या नात्याने त्या १० मजुरांना आपल्या गाडीत बसविले. दरम्यान वाहन काही अंतरावर गेल्यानंतर ग्राम ठाणा गावाजवळ एका वाहनाला साईड देत असताना टमाटरने भरलेला मेटॅडोर रस्त्याच्या कडेला उलटला. यात मेटॅडोर चालकासह ११ जण जखमी झाले. यात एका मुलीचा हात मोडला तर एक गर्भवती महिला गंभीर जखमी झाली. ठाणा येथील पोलीस पाटील प्रदीप बावनथडे यांनी ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन मागवून जखमींना उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 11 injured as matador overturns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात