एड्सच्या तोंडातून सुखरूप परतली ११ नवजात बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:13+5:30

ती जर एचआयव्ही बाधीत आहे तर प्रसूतीच्या पूर्वी त्यांना नेविरीपी सायरप देण्यात येते. इतकेच नव्हे तर त्या नवजात बालकांची दिड महिना, ६ महिने, १२ महिने व १८ महिने त्याची एचआयव्ही तपासणी केली जाते. दरम्यान त्या नवजात बालकांना नेविरीपी सायरपचे डोज दिले जातात. १८ महिन्यांचे झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या चाचणीत ते बालक एचआयव्ही पॉझीटीव्ह आहे किंवा नाही हे माहिती होते.

11 infants returned safely from AIDS mouth | एड्सच्या तोंडातून सुखरूप परतली ११ नवजात बालके

एड्सच्या तोंडातून सुखरूप परतली ११ नवजात बालके

ठळक मुद्देआता जगणार एड्समुक्त जीवन : आईच्या गर्भातच मिळाला होता आजार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : त्या ११ नवजात बालकांचे नशीब आपल्या आई पेक्षा वेगळे नव्हते. त्यांच्या आईला एचआयव्ही होता. तेव्हा ते पोटात होते. जन्माला आल्यानंतरही मृत्यूच्या डोहात जाण्याचे संकट त्यांच्यावर होते. परंतु विज्ञानाच्या काही वर्षातील अविष्कारामुळे ११ नवजातांना नवजीवन मिळाले. मागील काही वर्षापासून अशा बालकांची संख्या वाढत आहे.
शासनाने काही वर्षापूर्वी एचआयव्ही-एड्सच्या धोक्याला समजून एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून जागोजागी एड्स समुपदेशन व एआरटी केंद्र उघडले. या केंद्रांच्या माध्यमातून एड्स पीडितांना उपचाराखाली आणण्यात आले. गर्भवती महिलांना एचआयव्ही तर नाही याची शहानिशा करण्यासाठी तपासणी अत्यावश्यक करण्यात आली. तपासणीत ती महिला एचआयव्ही ग्रस्त आहे किंवा नाही याची माहिती होते.
ती जर एचआयव्ही बाधीत आहे तर प्रसूतीच्या पूर्वी त्यांना नेविरीपी सायरप देण्यात येते. इतकेच नव्हे तर त्या नवजात बालकांची दिड महिना, ६ महिने, १२ महिने व १८ महिने त्याची एचआयव्ही तपासणी केली जाते. दरम्यान त्या नवजात बालकांना नेविरीपी सायरपचे डोज दिले जातात. १८ महिन्यांचे झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या चाचणीत ते बालक एचआयव्ही पॉझीटीव्ह आहे किंवा नाही हे माहिती होते. सन २०१९-२० या वर्षात ११ गर्भवती मातांना एचआयव्ही असल्याचे समोर आले. जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी मागील काही वर्षापासून नवजात बालकांना तपासणीत आणून त्यांचे जीवन फुलविले. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील ११ मातांची ११ बालके एचआयव्ही मुक्त झाली आहेत.

तीन वर्षात ४० बालकांचे जीवन फुलले
आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान ११ माता गर्भवती असताना त्या एचआयव्ही पिडीत असल्याचे पुढे आले. ती सर्व बालके एचआयव्ही मुक्त झाली आहेत. यापूर्वी २०१७-१८ मध्ये १३, २०१८-१९ मध्ये १८ मातांना एचआयव्ही असल्याचे आढळले होते. परंतु २०१७-१८ मध्ये १२ व २०१८-१९ मध्ये १७ बालकांना या आजारातून मुक्त करण्यात आले. मागील ३ वर्षात ४२ गर्भवती महिलांना एचआयव्ही असल्याचे पुढे आले होते. त्यापैकी ४० बालके एचआयव्ही मुक्त झाले. विशेष म्हणजे, सन २०१० पासून हा कार्यक्रम चालविण्यात येत आहे. याचा लाभ अनेक बालकांना मिळत आहे.

Web Title: 11 infants returned safely from AIDS mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य