शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१०५ वाहनांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात अवैध गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात येत आहे. ...

गोंदिया : जिल्ह्यात अवैध गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात येत आहे. परंतु अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या १०५ वाहनांचे नोंदणी परवाने निलंबित करण्याची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत शुक्रवारी (दि.२२) करण्यात आली आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात महसूल अधिकारी-कर्मचारी हे रात्रंदिवस गस्त लावतात. त्यांच्यावर हल्ले देखील झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी गौण खनिज खनन प्रकरणात बैठक घेऊन पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. गौण खनिज अवैध खनन व अवैध वाहतूक प्रकरणात एकूण १०५ वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ व १९८९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांचे नोंदणी परवाने निलंबन करण्याची कारवाई झाल्यानंतर आता ही वाहने रस्त्यावर धावू शकणार नाही. या वाहनांना पुढील ९० दिवस पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशान्वये करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या १०५ वाहनांमध्ये गोंदिया ग्रामीण ठाणे १५ वाहन, रावणवाडी ३९ वाहन, अर्जुनी-मोरगाव २० वाहन, देवरी ५ वाहन, गोरेगाव ६ वाहन, दवनीवाडा १८ वाहन, गंगाझरी १ आणि रामनगर गोंदिया येथील १ वाहन आहे. तसेच नोंदणी-परवाना निलंबन केलेल्या ९२ ट्रॅक्टर, ट्राली ७४, ट्रक-टिप्पर ४, नंबर प्लेट नसलेले ट्रॅक्टर ४४, नंबर प्लेट नसलेली ट्राॅली २६, इतर राज्यातील ट्रॅक्टर २, इतर राज्यातील ट्राली १ आणि इतर राज्यातील १ टिप्परचा समावेश आहे. भविष्यात अवैध खनिज खनन प्रकरणात आढळल्यास कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.