शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार मजुरांना लाभला गुळाचा गोडवा

By admin | Updated: January 24, 2015 22:57 IST

गोंदिया जिल्ह्यातील एकमेव सडक-अर्र्जुनी तालुक्यात मध्यम प्रतीचे २५ गुळ कारखाने तर घरगुती, पारंपारीक पद्धतीचे ७८ कारखाने आहेत. यामध्ये ऊसापासून रस काढून गूळ तयार केले जाते.

तुकाराम झोडे - कोसमतोंडीगोंदिया जिल्ह्यातील एकमेव सडक-अर्र्जुनी तालुक्यात मध्यम प्रतीचे २५ गुळ कारखाने तर घरगुती, पारंपारीक पद्धतीचे ७८ कारखाने आहेत. यामध्ये ऊसापासून रस काढून गूळ तयार केले जाते. ऊस तोडणी पासून गूळ निर्मिती करेपर्यंत एका मध्यम प्रतीच्या गुळ निर्मिती कारखान्यावर एका दिवसाला १०० मजूराची गरज भासते. म्हणजेच एक कारखाना १०० मजुरांना रोजगार देतो. सडक-अर्जुनी तालुक्यात १०३ कारखाने असल्यामुळे १० हजार ३०० लोकांना हा व्यवसाय डीसेंबर ते एप्रिल असा पाच महिने रोजगार देतो. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे दोन-तीन वर्षापुर्वी रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील मजूर शहरांकडे मोठ्या प्रमाणात पलायन करीत होते. परंतु दोन-तीन वर्षापासून ग्रामीण भागात ऊसापासून गूळ निर्मिती करणारे लहान-मोठे कारखान्यांचे जाळे तयार झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूरांच्या हाताला काम मिळत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत असून शेतकरी ऊस लागवड शेतीकडे वळत आहे. गोंदिया-भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु निसर्गाचा प्रकोप व विविध समस्यामुळे धान उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस हवालदील होत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादक खर्च भागविने कठीण झाले आहे. त्यामुळे परंपरागत धान उत्पादन शेतीचा मोह टाळून तो आता ऊस उत्पादनाकडे वळत आहे. जिल्ह्यात गूळ निर्मिती करणाऱ्या कारखान्याची संख्या वाढत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. मधल्या काळात ऊसावर आधारीत ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे नव्हते. त्यामुळे धान उत्पादक काळात ऊसावर आधारीत ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे नव्हते. त्यामुळे धान उपादक शेतकरी पारंपारीक पद्धतीने फक्त धानाचीच शेती करायचा. परंतु ग्रामीण भागात छोटे-छोटे कारखाने उघडल्यामुळे ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.