शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

होय, 70 वर्षांपासून आम्ही भोगतोय; कावरे गावात आजही पाणी, वीज नाही, मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 2:45 PM

गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहेत.

केपे :  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १६ हजार लिटरपर्यंत पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली आहे, पण पण केवळ घोषणा केल्याने सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी प्रत्येक गावांमधील समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. असेच एक उदाहरण म्हणजे कावरे पिर्ला क्षेत्रातील एक गाव. त्यात धनगर समाजाचे १०० सदस्य पंचायत कार्यक्षेत्रात आहे.गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहे, आणि त्याबद्दल राग व्यक्त करत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले.केव्हाना, मायना या दुर्गम जंगली भागात राहून, ते अगदी मूलभूत पायाभूत सुविधांपासून दूर असल्याने आधीपासून या परिस्थितीत संघर्ष करत आहेत. त्यांच्याकडे योग्य रस्ता कनेक्टिव्हिटीची कमतरता आहे, कारण त्यांची घरे केपे शहरापासून १२ किमी आणि मुख्य रस्त्यापासून दोन किमी अंतरावर आहेत.मुख्यमंत्र्यांनी गोवा कुटुंबांना मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. हे आमच्यासारख्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी वरदान आहे. पण आमची परिस्थिती पाहिली तर सात दशकांपासून सरकार आम्हाला पाणी पुरवण्यात अपयशी ठरले असल्याने ही एक चुटकुली असल्याचे दिसते, असे धनगर (गवळी) रहिवासी भिरू टोको भावधन म्हणाले.सुमारे पाच वर्षांपूर्वी सरकारने विहीर बांधून मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु उन्हाळ्यात हा स्त्रोत सुकून जातो. कोणतीही पाईपलाईन टाकली गेली नाही आणि जानेवारीपर्यंत एका नाल्यातून पाणी उपलब्ध होते. पावसाळा होईपर्यंत आम्ही कसेबसे एकामेकाला आपआपल्या संकटांवर मात करण्यास मदत करतो, परंतु एक एक पाण्याच्या थेंबाला मिळवण्यासाठी आम्ही जंगलात वनात फिरतो. पाणी शोधण्यासाठी खूप दूर जावे लागते, असे दुसरे रहिवासी भागी भावधन म्हणाले.२़ पासून केपे मतदान विभागातून सांगे मतदारसंघाच्या अंतर्गत कामोना येते. आणलेल्या धनगर समाजासाठी इतर परिस्थिती देखील दयनीय आहे. सर्वात जवळची विजेची लाईन दोन किमी अंतरावर आहे, परंतु अद्याप विजेचे खांब उभारलेले नाहीत. आम्ही सात दशकांहून अधिक काळ रात्रीच्या वेळी चिमणीच्या दिव्यांवर जगलो आहोत. २०१६ मध्ये स्थानिक पंचायतीने बसवलेले सौर पॅनेलने केवळ तीन वर्षे काम केले. आता एकही बल्ब पेटवता येत नाही, आणि परिसर उजळवण्यासाठी वारंवार स्मरणपत्रे अपयशी ठरली आहेत. असे, जया भावधन या ६० वर्षीय महिलेने सांगितले.दोन किलोमीटर लांबीचा रस्ता आणि असमान मार्ग खराब अवस्थेत आहे, विशेषत: पावसाळ्यात, दुचाकी वाहनांसाठीही फारसा हा रस्ता उपयोगाचा नाही. सर्व कुटुंबांकडे शेळ्या पाळत होत्या आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे दूध विकण्यावर अवलंबून होते पण आता जुन्या शेळ्यांचस गोठाच रिकामा आहेत. जमीनदार आमच्या शेळ्यांना त्यांच्या काजूच्या बागेत फिरू देत नाहीत, म्हणून आम्ही त्यांना विकले. त्यांनी आम्हाला प्रत्येक घरासाठी सुमारे ५०० चौरस मीटर जमीन दिली, परंतु शीर्षक दस्तऐवजांची अद्याप नोंदणी करणे बाकी आहे, हे एका स्थानिकाने सांगितले. शिक्षण घेण्यातही एक अडथळा आहे. काही कुटुंबांनी आपल्या मुलांना ३० किमी अंतरावर असलेल्या वाल्किनी येथे नातेवाईकांच्या घरी पाठवले आहे आणि त्यांना तेथील सरकारी शाळेत दाखल केले आहे. 

टॅग्स :goaगोवाelectricityवीजWaterपाणी