शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसच्या निष्क्रिय नेत्यांचा नंबर कधी?

By admin | Updated: June 23, 2014 01:38 IST

दिग्विजय सिंग गुरुवारी गोव्यात : प्रवक्त्यांच्या हकालपट्टीनंतर विचारणा

पणजी : निष्क्रिय प्रवक्त्यांना काँग्रेसने बाहेरचे दरवाजे दाखवल्यानंतर आता पक्षातील निष्क्रिय नेत्यांची पाळी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसच्या कुचकामी नेत्यांबद्दल पक्षातच तीव्र असंतोष आहे. त्यामुळे अशा नेत्यांना नारळ कधी देणार, याची काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. २0१२ च्या विधानसभा निवडणुकीत फॅमिली राजने धोका दिलेल्या कॉँग्रेसला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. तरीही काँग्रेसमधील गटबाजी संपलेली नाही. नेत्यांची टोकाची निष्क्रियता, अंतर्गत गटबाजी आणि धुसफूस आता लपून राहिलेली नाही. दोन्ही निवडणुकांत पाठोपाठ दारुण पराभव पत्करावा लागल्याने या सर्व गोष्टी आता उघड झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्याशी अनेकांचे पटत नाही. कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता बोलत असल्याने ते नाराजी ओढवून घेतात. ज्युनियर राणे अर्थात विश्वजीत यांचा प्रदेशाध्यक्षांना नेहमीच विरोध असतो. खाण घोटाळ्यात ठपका असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आयडीसी घोटाळा प्रकरणी आमदार बाबू कवळेकर हे कधी कारवाईला सामोरे जातील, याची शाश्वती नसल्याने तोंड बंदच ठेवून आहेत. आमदार बाबूश मोन्सेरात काँग्रेसमध्ये असले तरी ते आपल्याला स्वतंत्र मानतात. ते आपला सावकारी, रियल इस्टेट, हॉटेल्सचा धंदा सांभाळून आहेत. पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात तसेच आमदार पांडुरंग मडकईकर हा त्यांचा गट मानला जातो. काँग्रेस विधिमंडळातच आमदारांमध्ये तीन गट आहेत. बाबूश मोन्सेरात, पत्नी जेनिफर व पांडुरंग मडकईकर एक गट, दिगंबर कामत व बाबू कवळेकर दुसरा गट आणि राणे पिता-पुत्र तिसरा असे हे गट आहेत. त्यामुळे आमदारांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. केवळ आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हेच तेवढे निष्ठावान दिसतात. माविन गुदिन्हो यांनी तर काँग्रेसवर उघड तोंडसुख घेणे सुरू केले आहे. त्याही पुढे जाऊन बाबूश यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासाठी कामच केले नाही, असे जाहीर सांगितले होते. दरम्यान, माजी आमदार तथा प्रवक्तेपदावरून काढून टाकलेले जितेंद्र देशप्रभू म्हणाले की, निष्क्रियता का आली याची कारणे शोधण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात नेते का कमी पडले हे शोधण्याची गरज आहे. कोणीही निष्क्रिय नसतो, त्यासाठी वातावरण आणि काही कारणे असू शकतात. निष्क्रियता ही कारवाईसाठी प्राथमिकता असता कामा नये. विरोधी पक्षनेत्याचे विधानसभेतील काम चांगले आहे. प्रत्येक काम सत्ताधाऱ्यांना घेरूनच करून घेता येईल, असे नाही. राणे मुत्सद्दी आहेत. प्रवक्तेपदावरून हटविल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तरुणांना वाव देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलले असेल तर त्याचे मी स्वागत करतो. (प्रतिनिधी)