शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

गोव्यात काँग्रेसचे दोन आमदार फुटले; पहाटेच भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीवारीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 6:30 AM

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही सोमवारी पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही सोमवारी पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. या पार्श्वभुमीवर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार आज पहाटे भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

गोव्याला नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे याची कल्पना गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोप यांनाही आली आहे. सरकारमधील तीन मंत्री १७ किंवा १८ रोजी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांना भेटून राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवतील.  पर्रीकर दोनापावल येथील निवासस्थानी आहेत. ते २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सत्तेतील घटक पक्ष पर्यायी मुख्यमंत्री कोण असेल, याची चर्चा करीत आहेत. शर्यतीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे पुढे आहेत. मात्र, मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्यांना मंजुरी नाही. गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांचा राणे यांना पाठिंबा आहे. राणे हे काँग्रेसमधून आलेले असल्याने त्यांचे समर्थक आमदारही भाजपच्या वाटेवर आहेत. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे काँग्रेसचे दोन आमदार आज दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचे दोन आमदार फोडावेत, असा प्रयत्न भाजपा करीत आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांना भाजपाने गळ टाकलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर करून, काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, परस्पर विधानसभा करू नये, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाcongressकाँग्रेस