शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटांना ‘कॉर्नर’, फुटबॉलप्रेमी संतप्त

By admin | Updated: December 15, 2014 01:23 IST

चौकशीची मागणी : जाहिरात फलक पेटवला, शेडची मोडतोड

मडगाव : आयएसएल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी १७ डिसेंबरला एफसी गोवा आणि अ‍ॅटलेटिको कोलकाता यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलची तिकिटे संपल्याने अनेक फुटबॉल चाहत्यांचा हिरमोड झाला. तिकीट काउंटरवर तिकिटे संपल्याचे सांगितल्यानंतर संतप्त लोकांनी आपला राग पत्र्याच्या शेडवर काढला. त्यांची मोडतोड केली. जाहिरात फलकांनाही आग लावली. त्यामुळे वातावरण तंग बनले. मडगाव अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही घटनास्थळी जाऊन रांगेत रात्रीपासून ताटकळत असलेल्या लोकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. तिकिटांचा काळा बाजार झाला असून, त्याची चौकशी होण्याची गरज त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. शनिवारीही स्टेडियमबाहेर स्फोटक स्थिती होती. काही अवघीच तिकिटे आणि त्यासाठी अपेक्षेबाहेर मागणी, असे चित्र होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही असंतोष निर्माण होऊन धक्काबुक्की होण्याचे प्रकारही घडले होते. १७ डिसेंबरला फातोर्ड्याच्या नेहरूस्टेडियमवर एफसी गोवा आणि अ‍ॅटलेटिको कोलकाता यांच्यात सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्याची तिकिटे मिळावीत यासाठी शनिवारी तसेच रविवारीही लोकांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी सव्वादहाच्या सुमारास तिकिटे संपल्याचे जाहीर केल्यानंतर लोकांच्या संतापाचा पारा चढला. प्रक्षुब्ध जमावाने राग शेडपत्र्यांवर काढताना, त्यांची मोडतोड केली व जाहिरात फलकही पेटवून दिले. घटनास्थळी ज्यादा पोलीस कुमक पाठवून देण्यात आली. उपअधीक्षक मोहन नाईक, पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन संतप्त जमावाला शांत केल्याने बऱ्याच वेळाने वातावरण निवळले. आॅनलाईन तिकिटे अर्ध्या तासात संपली फातोर्ड्यात रंगणाऱ्या सेमीफायनलच्या तिकिटांची विक्री आॅनलाईनही उपलब्ध होती. मात्र, अर्ध्या तासात ही तिकिटे संपली. त्यामुळे यात काहीतरी काळेबेरे असावे, असा संशयही व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी आॅनलाईन तिकिटे विकण्यास सुरुवात झाली होती. मात्र, अर्ध्या तासात तिकिटे संपल्याचे दिसू लागल्याने सकाळपासून इंटरनेटवर बसलेल्या फुटबॉलप्रेमींचीही घोर निराशा झाली. (प्रतिनिधी)