लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: नाईकनगर, बोर्डे-डिचोली येथील बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या घटनेत वडिल संजय म्हापसेकर यांनी मुलगा संचित याचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान घरातून वडिलांनी लिहिलेली १२ पानी चिठ्ठी ताब्यात घेण्यात आली. प्राथमिक तपासात या चिठ्ठीत मुलगा आपले ऐकत नव्हता, असे नमूद केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मुलाने वडील आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार पोलिस स्थानकात नोंदवली होती. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
म्हापसेकर यांनी घराच्या पुढील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि मागील दरवाजातून आत प्रवेश करून मुलाचा खून केला. त्यानंतर त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वॉड आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले.
ही घटना सोमवारी (१६ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. मयत संजय यांची मुलगी कामावरून घरी परतल्यानंतर तिने घरात प्रवेश करताच ही धक्कादायक बाब लक्षात आली.
दरम्यान, मृत बाप-लेकावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. या प्रकरणी डिचोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा तसेच गोवा बाल कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मुलाची पोलिसात तक्रार
पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सखोल पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. प्राथमिक माहितीनुसार, मृत संचितच्या गळ्यावर खुणा आढळून आल्याने त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने पूर्वी संचितने वडिलांकडून होत असलेल्यामारहाणीबाबत पोलिसांकडे तक्रार केल्याची माहितीही पुढे आली आहे.
चिठ्ठीत वडिलांची मुलाबद्दल तक्रार
घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीत संजय यांनी मुलगा 'मस्ती करत असल्याचा उल्लेख केला असून, मुलीची काळजी घेण्याबाबतही लिहिले असल्याचे समजते. त्यामुळे मुलाला मारहाण केल्यानंतर संजय यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
Web Summary : In Dicholi, a father, Sanjay Mhapsekar, murdered his son Sanchit and committed suicide. A note revealed the son's disobedience as a motive. The father locked the house, killed his son, and poisoned himself. Police investigation and forensic analysis are underway to determine the exact cause.
Web Summary : डिचोली में, संजय म्हापसेकर नामक एक पिता ने अपने बेटे संचित की हत्या कर आत्महत्या कर ली। एक नोट में बेटे की अवज्ञा को एक कारण बताया गया है। पिता ने घर को बंद कर दिया, अपने बेटे को मार डाला, और जहर खा लिया। पुलिस जांच और फोरेंसिक विश्लेषण जारी है।