शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

मंत्री श्रेष्ठ की पक्ष? काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी घेतला भाजपचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 08:47 IST

मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते.

गोव्यातील भाजपचा ताबा काँग्रेसमधून आलेल्या अनेक नेत्यांनी घेतला आहे. मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते. भाजपने ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मंडळ अध्यक्ष निवडीचे नाट्य पार पाडले. लवकर एकदाचे मंडळ अध्यक्ष निवडण्याची सूचना दिल्लीहून येताच गोव्यातील भाजप नेते सोपस्कार पार पाडतात. पूर्वी अशाच प्रकारे सदस्य नोंदणी मोहीम उरकून चार ते पाच लाख सदस्य भाजपकडे असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले होते. प्रत्यक्षात दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवाराचा पराभव झाला. मग ते प्रचंड सदस्य गेले कुठे? संघटनात्मक निवडणुकीवेळी काही मंत्री व आमदारांनाच झुकते माप दिले जाते, ही निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची खंत आहे. 

फोंड्यात भाजप मंडळ अध्यक्ष निवडीबाबत मंत्री रवी नाईक यांनी स्वतःला हवे तेच केले. थिवीत मंत्री नीळकंठ हळर्णकर मात्र तसे करू शकले नाहीत. भाजपने निवडलेले काही मंडळ अध्यक्ष पक्षात कधी आले, त्यांनी पक्षाचे काम दहा वर्षे तरी केले का, असा प्रश्न निर्माण होतो. दाबोळी मतदारसंघात मंत्री माविन गुदिन्हो यांना हवा तोच मंडळ अध्यक्ष झाला. कुडचडे, कळंगुट व पेडणे मतदारसंघातही तसे घडले नाही. जिथे मंत्री बलाढ्य आहेत, तिथे पक्षाने मंत्र्यांचे ऐकले. नीलेश काब्राल जर मंत्रिपदी असते तर त्यांचेही ऐकले असते. काब्राल यांनी आपल्या मनातला सगळा राग परवा व्यक्त केलाच. कुडचडे मतदारसंघात प्रकल्प रखडले आहेत, आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून त्यासाठी सहकार्य मिळत नाही असे काब्राल यांनी सांगून टाकले. आपले मंत्रिपद वर्षभरापूर्वी काढले तेव्हा 'भिवपाची गरज ना' अशी ग्वाही देण्यात आली होती; पण कुडचडेत विकासकामांची गाडी पुढे गेलीच नाही, असे सांगत काब्राल यांनी नेतृत्वावर बाण सोडला.

मंत्री माविन यांनी गोव्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी सदानंद तानावडे हेच योग्य आहेत, असे प्रमाणपत्र दिले. २०२७ ची विधानसभा निवडणूक जर भाजपला सोपी जायची असेल तर तानावडे यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद ठेवावे लागेल, असे माविन सांगतात. म्हणजे एवढ्या मोठ्या पक्षात अजून एकही नवा दमदार प्रदेशाध्यक्ष तयार होऊ शकला नाही ? मंत्री माविन यांनी पूर्ण पक्षाचा अभ्यास केला आहे का ? अर्थात नरेंद्र सावईकर प्रदेशाध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत, असे चित्र निर्माण झाल्याने काही मंत्री, आमदार नाक मुरडू लागले आहेत, याची कल्पना येतेच. 

लोकसभा निवडणुकीवेळीदेखील सावईकर यांना तिकीट मिळू नये म्हणून काही नेत्यांनी पडद्याआड राहून गेम खेळला होताच. वास्तविक जे काँग्रेस पक्षात चालते, तेच भाजपमध्ये चालते. फक्त काहीवेळा पक्षशिस्त किंवा शिष्टाचाराच्या आवरणाखाली पक्षातील असंतोष मीडियापर्यंत पोहोचू दिला जात नाही. आता दामू नाईक, दयानंद मांद्रेकर, बाबू कवळेकर, दिलीप परुळेकर असे अनेकजण प्रदेशाध्यक्षपद मिळवू पाहत आहेत; मात्र माविन यांना त्यांच्यात कुणी पात्र दिसत नाही. तानावडे यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने निश्चितच चांगले काम केले. त्यांनी पक्ष मजबूत केला; मात्र ते आता राज्यसभा खासदार झाले असल्याने पक्षातील काही अनुभवी नेत्यांना आपणही प्रदेशाध्यक्ष व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे.

पणजीत मंडळ अध्यक्ष निवडीवेळी संजीव देसाई यांनी भाषण केले. देसाई हे पणजी मंडळाचे मावळते अध्यक्ष आहेत. त्यांनी भाजपकडे दोषाचे बोट दाखविले, पण मंत्री बाबूश मोन्सेरात यांना मात्र छानपैकी क्लीन चीट दिली. एकवेळ भाजपकडून कोणाच्या तरी बदल्या कर किंवा अन्य प्रकारे सूड उगवला जातो, पण बाबूश कधी सूड घेत नाहीत, असे संजीव देसाई म्हणाले. याबाबतचा व्हिडीओ पाहून लोकांनी आपले मनोरंजन करून घेतले. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सर्व मंत्र्यांना सध्या डोक्यावर बसवत आहेत. समजा भविष्यात कधी रवी, सुभाष, दिगंबर कामत, विश्वजित, रोहन, बाबूश, माविन, बाबू कवळेकर, संकल्प वगैरेंनी भाजपला रामराम म्हटले तर किती मंडळ अध्यक्ष व किती कार्यकर्ते पक्षासोबत राहतील ? तूर्त एवढेच पुरे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस