शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

खनिज लिजेस ताब्यात घ्या!

By admin | Updated: June 22, 2014 02:26 IST

पणजी : न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सर्व खनिज लिजेस सिल करावीत व स्वत:च्या ताब्यात घ्यावीत. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या खाणमालकांवर

पणजी : न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सर्व खनिज लिजेस सिल करावीत व स्वत:च्या ताब्यात घ्यावीत. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या खाणमालकांवर कारवाई करून येणारे पैसे सरकारी तिजोरीत जमा करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी केली. खनिज व्यवसाय बंद असला तरी बेकायदा खनिज व्यवसाय सुरू आहे. सरकार याकडे डोळेझाक करून खनिज व्यावसायिकांना पाठीशी घालत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने लिज ताब्यात घ्यायला हवी होती. सीईसी अहवालाप्रमाणे ३९५ दशलक्ष मेट्रिक टन खनिज निर्यात झाली आहे. सरकारने याचे पैसे खनिजमालकांकडून वसूल करून ट्रकमालकांना व खाणपीडितांना द्यावेत. काँग्रेस सरकारने सर्वच बाजूने लूट चालविली होती. मात्र, भाजपा सरकार बेकायदा गोष्टींना थंडपणे सहकार्य करत असल्याचा आरोप गावस यांनी केला. या विषयात आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ई-लिलाव हाही घोटाळा असल्याचा आरोपही गावस यांनी केला. विधानसभा निवडणुकांपूर्वी पर्रीकरांनी प्रादेशिक आराखडा, खनिज, पर्यटन योजना, कोमुनिदाद, राज्याला खास दर्जा देणे इत्यादी विषयांवर तत्काळ निर्णय घेण्यात येणार, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी अनेक यू-टर्न घेतले. आता राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने मुख्यमंत्र्यांना तसे करता येणार नाही, असे गावस म्हणाले. अविनाश तावारिस म्हणाले, सरकारने पन्नास हजार नोकऱ्या दिल्या जातील, अशी घोषणा केली. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या औद्योगिक वसाहतींत मोठ्या व महत्त्वाच्या हुद्यावर बिगर गोमंतकीयांची नियुक्ती करण्यात येते. सरकारने गोमंतकीय युवकांसाठी कशा प्रकारच्या आणि कुठले क्षेत्र आणि विभागात किती नोकऱ्या देण्यात येतील याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)