'सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली गोव्यात विद्यार्थी काँग्रेसची वाटचाल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:03 IST2026-03-03T13:02:33+5:302026-03-03T13:03:26+5:30

सुनेत्रा पवार यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

student congress progress in goa under the leadership of sunetra ajit pawar | 'सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली गोव्यात विद्यार्थी काँग्रेसची वाटचाल'

'सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली गोव्यात विद्यार्थी काँग्रेसची वाटचाल'

पणजी :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर आम्ही सगळेच पोरके झालो. आमचा राजकीय गुरूच हरपल्याने पुढील वाटचालही कुठेतरी थांबली होती. मात्र, त्यांच्या पत्नी तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा ताबा घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य मानकर यांनी केले.

सुनेत्रा पवार यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादीचे काम तळागाळापर्यंत सुरूच राहणार आहे.
 

Web Title : सुनेत्रा पवार के नेतृत्व में गोवा में छात्र कांग्रेस की प्रगति

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, सुनेत्रा पवार के नेतृत्व में राष्ट्रीय छात्र कांग्रेस पुनर्जीवित हो रही है। राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य मानकर ने राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष के रूप में उनकी नियुक्ति के बाद जमीनी स्तर पर काम करने के लिए नए समर्पण की पुष्टि की। पार्टी का लक्ष्य जमीनी स्तर तक अपनी पहुंच जारी रखना है।

Web Title : Sunetra Pawar Leads Student Congress Forward in Goa

Web Summary : Following Ajit Pawar's loss, National Student Congress revives under Sunetra Pawar's leadership. National President Chaitanya Mankar affirmed renewed dedication to grassroots work after her appointment as Nationalist Congress President. The party aims to continue its reach to the grassroots level.