लोकमत न्यूज नेटवर्क, साळ: कोलवाळ येथील श्रीराम मंदिरमध्ये श्रीराम नवमी उत्सव सोहळा २०२६ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. १९) गुढीपाडव्यादिनी स. ७ वा. गणेशपूजा, महागणपती हवन नंतर गुढीपूजन, गुढी रोहण, लघुरुद्र व स्थानिक भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम. संध्या. ६ वा. पंचांग संवत्सर फल वाचन व रात्री ८ वा. पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. हर्षद जोगळेकर यांचे कीर्तन. दि. २० ते दि. २५ दरम्यान दररोज रात्री ठीक ८ वा. कीर्तन, दि. २६ रोजी रामनवमीदिनी सकाळी १० वा. कीर्तन व दु. १२ वा. श्रीराम जन्म सोहळा. त्यानंतर तीर्थप्रसाद होईल. दु.१२.१५ ते ४ वा. पर्यंत श्रीराम नाम जप, संध्या. ६.३० वा. पालखीतून गावात मिरवणूक व श्रींच्या पालखीतील फळफळावळीची पावणी होईल.
शुक्रवारी (दि. २७) सकाळी ९ वा. लघुरुद्र, आरती, तीर्थप्रसाद. दुपारी ब्राह्मण सुवासिनी भोजन व सामराधना. संध्या. ७ वा. कीर्तन व रात्री ९ वा. फळांची पावणी. रात्री १० वा. श्री राष्ट्रोळी कला क्रीडा व ग्रामविकास मंडळ, धारवाडीनिर्मित आनंद म्हाडगुत दिग्दर्शित तीन अंकी संगीत नाटक 'संगीत संत गोरा कुंभार' सादर केले जाईल.
शनिवारी (दि. २८) ९.३० वा. देवी माउली कला, क्रीडा व सांस्कृतिक, मंडळ मेणकुरेतर्फे ऐतिहासिक नाटक 'रायगडाला जेव्हा जाग येते' सादर होईल, असे सुहासिनी चोडणकर व कुटुंबीय कोलवाळ व व्यवस्थापक श्रीराम देवस्थान समिती-कोलवाळतर्फे कळविण्यात आले आहे.
Web Summary : Kolwal's Shri Ram temple hosts Shri Ram Navami celebrations from Gudi Padwa. Events include kirtans, bhajans, Ram Janmotsav, palanquin procession, and a drama.
Web Summary : कोलवाल के श्रीराम मंदिर में गुड़ी पड़वा से श्रीराम नवमी उत्सव का आयोजन। कीर्तन, भजन, राम जन्मोत्सव, पालकी जुलूस और नाटक शामिल हैं।