शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

मांडवी नदीत लवकरच तरंगते हॉटेल

By admin | Updated: December 15, 2014 01:23 IST

गोव्यातील पहिले फ्लॉटेल : चौदा खोल्या, १३ मीटर लांबी, ६० प्रवासी क्षमता

सद्गुरू पाटील-पणजी : मांडवी नदीत आता यापुढे गोव्यातील पहिले फ्लॉटेल पाहायला मिळणार आहे. चौदा खोल्या, तेरा मीटर लांबी व साठ प्रवासी क्षमता असलेले हे हॉटेल तथा फ्लॉटेल बांधून तयार आहे. यापुढील काळात ते मांडवीत तरंगताना पाहायला मिळेल. विजय मरीन शिपयार्डने या फ्लॉटेलचे डिझाईन तयार करून पूर्ण बांधणी केली आहे. पेंग्विनच्या आकाराचे फ्लॉटेल म्हणजे पाण्यावर तरंगणारे हॉटेल. एकाच वेळी हॉटेल व प्रवासी वाहतूक करणारे जहाज अशा दोन रूपांत ते आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यावर हेलिपॅडही असेल. अत्यंत उच्च दर्जाचे व जगातील अत्यंत श्रीमंत असे पर्यटक या फ्लॉटेलमध्ये येतील, असे अपेक्षित आहे. त्या दृष्टीनेच फ्लॉटेलची रचना आहे. आत खूप आरामदायी वातावरण असेल. स्पा, जाकुझी हॉट टब्स, व्हीआयपी पाहुण्यांसाठी सुट, अशी याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. विजेची गरज भागविण्यासाठी ३३० केव्ही क्षमतेचे जनरेटरही आत असतील, असे सूत्रांनी सांगितले. एकाच जागेवर नांगरून न ठेवता फ्लॉटेल नदीत फिरविले जाईल. नेमके कधीपासून फ्लॉटेल सुरू होईल व मांडवीत येईल ते स्पष्ट झालेले नाही. संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावरही त्याबाबतचे सुतोवाच आहे. पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांच्या स्वागताची भूमिका सरकारने घेतली आहे.