शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धुवाँधार!

By admin | Updated: June 20, 2014 02:43 IST

पणजी : मुसळधार पावसाने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही राज्याला झोडपले. नऊ तासांत दीड इंच तर ३६ तासांत २.५९ इंच पावसाची नोंद झाली.

पणजी : मुसळधार पावसाने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही राज्याला झोडपले. नऊ तासांत दीड इंच तर ३६ तासांत २.५९ इंच पावसाची नोंद झाली. संततधार राहिल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. राजधानीत रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी तुंबले. परिणामी दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले. म्हापशात काही दुकानांमध्ये पाणी शिरले. झाडांची पडझड तसेच वीज खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. एकूण मोसमी पाऊस १५ इंचांवर पोहोचला. हवामान वेधशाळा संचालक के. व्ही. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी २४ तासांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. ताशी ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि समुद्र खवळलेला असेल. गुरुवारी पावसाने जोर धरला असला तरी तुलनेत प्रमाण १११.२ मि.मी. म्हणजेच ४.३७ इंचांनी कमीच आहे. अग्निशामक दलाला दिवसभरात पडझडीचे ४२ कॉल्स आले. घरांवर झाडे कोसळून नऊ ठिकाणी नुकसान झाले. मडगाव परिसरात ३, पेडणे तालुक्यात २, काणकोणात २ तर कुडचडे आणि कुंडई येथे प्रत्येकी एका घरावर झाड पडले. सुदैवाने जीवितहानी मात्र झालेली नाही. व्हडलेभाट, ताळगाव येथे रस्त्यावर माड पडल्याने वाहतूक खोळंबली. मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी किरकोळ अपघातही झाले. वीजवाहिन्यांवर वृक्ष कोसळल्याने अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. (प्रतिनिधी) काणकोणात सर्वाधिक पाऊस काणकोण तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक २.६२ इंच पाऊस झाला. वाळपईत २.५५, साखळीत १.८२, मडगावात १.७१, केपेत १.४४, पेडणे तालुक्यात १.४४, म्हापशात 0.८२ इंच पावसाची नोंद झाली. फोंड्यात १५ तर मुरगाव तालुक्यात सर्वात कमी केवळ ८ मि.मी. पावसाची नोंद झाली.