शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सत्तरीत झाडांची कत्तल

By admin | Updated: June 4, 2014 01:36 IST

वाळपई : नव्या लागवडीच्या नावाखाली सत्तरीत वन खात्याकडून झाडांची कत्तल सुरू केली आहे.

वाळपई : नव्या लागवडीच्या नावाखाली सत्तरीत वन खात्याकडून झाडांची कत्तल सुरू केली आहे. वन खात्याने चालविलेल्या कृत्यामुळे वन्यजीवांवर संकट उभे राहाण्याची भीती असून, असा प्रकार करंजोळ, हिवरे, कुडशे व सध्या ठाणे डोंगुर्ली येथे सुरू आहे. ठाणे-डोंगुर्ली येथील सर्वे क्र. १५ मध्ये असगी क्षेत्रात सध्या ५० हेक्टर जमिनीत वनखात्यातर्फे झाडांची कत्तल सुरू आहे. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी कत्तल सुरू आहे, ते क्षेत्र म्हादई अभयारण्यात येते. त्यामुळे वन खात्याच्या प्रकाराबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत. वन खाते काजू लागवडीच्या नावाखाली मोठमोठी झाडे तोडीत आहे. फणस त्यानंतर त्या जमिनीत उपयोगी नसलेली झाडे लावीत असून, त्याचा कोणालाही फायदा होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी जंगलतोड सुरू आहे, त्या ठिकाणी सांबर, हरण, गवारेडा, माकडे या वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या वन्य प्राणी कुमयो या झाडापासून मिळणार्‍या फळाचा वापर अन्न म्हणून करीत असल्याने त्याचीच कत्तल सुरू आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या मोकळीकतेवरच घाला घालण्याचा हा प्रकार वाटू लागला आहे. कत्तल करण्यात आलेल्या झाडांमध्ये सागवान, किनळ व कुमयो प्रकारातील झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे वनखात्याच्या या वागण्यामुळे कुंपणच शेत खाते, तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल उपस्थित होत आहे. सामान्य जनतेला म्हादई अभयारण्यात जातासुद्धा येत नाही. त्या ठिकाणी असलेले एक झाडसुद्धा तोडण्याची परवानगी नाही. मग वन खातेच झाडांची कत्तल करू लागले, तर झाडांचे रक्षण कुणी करायचे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ज्यांची झाडांची सुरक्षा करण्यासाठी नेमणूक केली आहे, त्यांनाच झाडे तोडण्याचे कंत्राट मिळाल्याचे वाटते. वन खात्याच्या या वृत्तीमुळे म्हादई अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. वन खाते सत्तरीत ठिकठिकाणी म्हादई अभयारण्यात मोठमोठ्या झाडांची कत्तल करीत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वन खात्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)