शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव नगराध्यक्षासाठी इच्छुकांतच रस्सीखेच

By admin | Updated: June 1, 2014 01:48 IST

मडगाव : मडगावच्या नगराध्यक्ष निवडीसाठी ३ जूनला होणार्‍या निवडणुकीसाठी तब्बल आठ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज नेले असले, तरी अंतिम लढत सदानंद नाईक,

मडगाव : मडगावच्या नगराध्यक्ष निवडीसाठी ३ जूनला होणार्‍या निवडणुकीसाठी तब्बल आठ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज नेले असले, तरी अंतिम लढत सदानंद नाईक, गोंझाक रिबेलो व अविनाश शिरोडकर यांच्यात होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी गटाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत गोंझाक रिबेलोंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असले, तरी शिरोडकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी गटातून या निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा, यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी भाई नायक यांच्या आके येथील निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीवेळी अविनाश शिरोडकर व गोंझाक रिबेलो या दोघांनीही आपली नगराध्यक्षाची इच्छा व्यक्त केली. दोघांमध्येही समझोता होऊ न शकल्यामुळे शेवटी लॉटरीद्वारे उमेदवार ठरवावा, असा पर्याय पुढे आला. मात्र, या पर्यायाला शिरोडकर यांनी आक्षेप घेतल्याचे या बैठकीला हजर असलेल्या एका नगरसेवकाने सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे सत्ताधारी गटाच्या या बैठकीला विरोधी गटातील लक्ष्मीकांत कामत हेही उपस्थित होते, तर आपल्या वैयक्तिक कामामुळे सत्ताधारी गटातील संगीता अवदी या बैठकीला हजर राहिल्या नाहीत. शेवटी उपस्थित नगरसेवकांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे, असे ठरविण्यात आले. या वेळी रिबेलो यांना ८, तर शिरोडकर यांना २ मते मिळाली. या घडामोडीनंतर गोंझाक रिबेलो नगराध्यक्ष होतील असे मानले जात होते. मात्र, पूर्वीच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. आपण अजूनही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहोत, असे शिरोडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. उद्या, रविवारीही सत्ताधारी गटाची बैठक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विरोधी गटाकडून बहुतेक सदानंद नाईक यांनाच उमेदवार म्हणून पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या गटातून सुशीला नायक, बेर्था कार्दोज, दामोदर शिरोडकर व टिटो कार्दोज यांनीही उमेदवारी अर्ज नेले आहेत. या संदर्भात शिरोडकर यांना यात जिंकणार कोण, असे विचारले असता दि. ३ जून रोजीच ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. विरोधी गट एकसंध असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)