रेकॉर्डब्रेक पाऊस!

By Admin | Updated: June 21, 2015 02:31 IST2015-06-21T02:31:31+5:302015-06-21T02:31:38+5:30

पणजी : राज्यात तीन दिवसांत सरासरी १० इंच पाऊस कोसळला असून मडगावमध्ये १८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

Record Brake Rain! | रेकॉर्डब्रेक पाऊस!

रेकॉर्डब्रेक पाऊस!

पणजी : राज्यात तीन दिवसांत सरासरी १० इंच पाऊस कोसळला असून
मडगावमध्ये १८ इंच पावसाची नोंद झाली आहे. या तीन दिवसांच्या पावसामुळे यंदा सामान्य प्रमाणापेक्षा २० टक्के पाऊस अधिक पडला आहे.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार, तीन दिवसांत राज्यभर सरासरी १० इंच पाऊस पडला. शनिवार, २० जून रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत २५ इंच पावसाची नोंद झाली होती. हवामान खात्याच्या हिशेबानुसार, या तारखेपर्यंत सामान्य पाऊस हा २० इंच इतका असतो. प्रत्यक्ष पाऊस हा २५ इंचांपेक्षा अधिक नोंद झाला आहे. म्हणजेच २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने उद्याही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
किंचित वायव्येच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात केवळ किनारपट्टी भागातच पावसाने धडक दिली होती; परंतु आता मान्सूनची दिशाही नैर्ऋत्य-ईशान्य अशी सुरळीत झाल्यामुळे राज्यातील अंतर्गत भागातही पाऊस पडू लागला आहे. २४ तासांत सांगेत ६ इंच, केपेत ४.५ इंच, फोंड्यात ४.७, तर साखळीत ५.५ इंच पाऊस पडला.
...तर पावसाचे दीड शतक
पावसाचा धडाका असाच कायम राहिला, तर यंदा १४० इंचांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १० वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गोव्यातील सरासरी
पाऊस हवामान खात्याने १२७ इंच एवढा ठरविला आहे. २०१४ मध्ये तो १३० इंच
एवढा नोंदवला गेला. या वर्षी पावसाचा सध्याचा जोर कायम राहिल्यास सप्टेंबरअखेरीस १४० ते १५० इंच पावसाची नोंद होणे शक्य आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Record Brake Rain!