शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अधिकतम विद्यालयांचे ‘रेटिंग’ तीन स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:50 IST

गोव्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांची आता रेटिंगसाठी कसोटी लागली आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने नुकत्याच केलेल्या पाहणीत राज्यातील अधिकतम विद्यालयांना तीन स्टार मिळालेले आहेत.

पणजी: गोव्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांची आता रेटिंगसाठी कसोटी लागली आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने नुकत्याच केलेल्या पाहणीत राज्यातील अधिकतम विद्यालयांना तीन स्टार मिळालेले आहेत. विद्यालयात पायाभूत सुविधा, अस्वच्छ प्रसाधनगृहे, अपुरे वाचनालय, अपूर्ण क्रीडा सुविधा, ई- लर्निंगच्या सुविधांचा अभाव, संगणक प्रयोगशाळा आहे पण त्यामध्ये एसीची सोय नाही. त्याचप्रमाणे डिजिटल सुविधांचा अभाव, विद्यालयाचे फेसबूक किंवा वॉटसअप खाते नसणे, अपुरा सभागृह, अपुरा स्टोअर रुम, मैदानाचा अभाव या गोष्टींमुळे गुण कमी होऊन रेटिंगही कमी मिळते. यावरुन असा निष्कर्ष निघत आहे की राज्यातील बऱ्याच विद्यालयांमध्ये या सुविधांचा अभाव आहे. 

गोवा बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये यांच्याकडून विद्यालयांचे रेटिंगविषयी माहिती घेतली असता असे आढळून आले की, राज्यात ३९४ माध्यमिक आणि १0७ उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. चार स्टार प्राप्त केलेली विद्यालये सुमारे २0 टक्के आहेत तर तीन स्टार मिळालेल्या विद्यालयांची संख्या जास्त आहे. तीन स्टार मिळालेल्या विद्यालयांमध्ये कोणत्या ना कोणत्या सुविधांचा अभाव आहे.  भगिरथ शेट्ये म्हणाले की, ‘गोवा बोर्ड पेपरलेस बनविण्यासाठी तसेच पारदर्शकतेसाठी आणखीही काही उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. ज्या विद्यालयांमध्ये कमतरता आढळून आलेल्या आहेत त्या त्यांनी भरुन काढाव्यात यासाठी बोर्डाचे प्रयत्न असून त्यांच्यासाठी कार्यशाळाही घेतल्या जात आहेत. पेडणें, कुडचडें येथे अशा कार्यशाळा घेतलेल्या आहेत.  विद्यालयाचा नऊवी, दहावीचा निकाल, विद्यालयाची आर्थिक स्थिती, वार्षिक आॅडिट केले आहे की नाही, स्टाफ रुमची पुरेशी व्यवस्था आहे की नाही, मुख्याध्यापकांना बसण्यासाठी पुरेसे दालन आहे की नाही, विद्यालयाला स्वत:ची इमारत आहे की नाही, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाहीत, कॅण्टीन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, विशेष मुलांसाठी रॅम्प किंवा इतर सुविधा आहेत की नाहीत, सुरक्षा व्यवस्था याबाबतीत विद्यालयाची काय स्थिती आहे याची माहिती मिळते. शिवाय विद्यालयाची उपलब्धी, विद्यालयाने कोणते व किती पुरस्कार प्राप्त केले आहेत यासंबंधीही माहिती प्राप्त होते. 

गोवा शालांत मंडळ आता पेपरलेस बनले आहे. आयटीची कास धरताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांचे तब्बल २४ निकष लावून रेटिंगही करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपलब्धता, निकाल आदी निकषांवर राज्यातील या विद्यालयांची स्थिती काय आहे याची माहिती गोवा बोर्डाच्या संकेतस्थळावर एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध झाली आहे. बोर्डाच्या अधिमान्यतेसाठी केले जाणाºया कागदोपत्री सोपस्कारांना पूर्णविराम मिळाला असून हे सर्व सोपस्कार आता आॅनलाइन होत आहे. 

गोवा बोर्डाच्या संकेतस्थळावर संस्था या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अधिमान्यता असलेल्या विद्यालयांची यादी येते. प्रत्येक विद्यालयाचे रेटिंग तसेच त्यांची इतर माहितीही उपलब्ध होते. रेटिंगमध्ये ज्या विद्यालयांना पाच स्टार मिळालेले आहेत त्यांना ७ वर्षे इन्स्पेक्शनच्या बाबतीत मुभा आहे. या विद्यालयांचे इन्स्पेक्शन केले जाणार नाही मात्र दरवर्षी त्यांनी पायाभूत सुविधा किंवा अन्य बाबतीत काही बदल असल्यास माहिती अपडेट करावी लागेल. बोर्डाच्या अधिमान्यतेसाठी पूर्वी अर्ज सादर करताना नक्कल अर्जही द्यावा लागत असे. कागदोपत्री सोपस्कारांमध्येच वेळ वाया जात होता. आता या सर्व गोष्टी आॅनलाइन केल्याने शाळा व्यवस्थापनांचाही वेळ वाचेल.

टॅग्स :Schoolशाळाgoaगोवा