लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आगामी उन्हाळी सुट्या तसेच गुड फ्रायडे आणि इस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि बंगळुरूहून मडगावसाठी विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी मुंबई सीएसएमटी ते मडगावदरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी (०१०१९/०१०२०) जाहीर करण्यात आली आहे. ही गाडी ५ एप्रिल २०२६ ते ७जून २०२६ या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. गाडी क्र. ०१०१९ मुंबई सीएसएमटीहून दर रविवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१०२० मडगावहून रविवारी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३:५० वाजता मुंबईत पोहोचेल.
२२ डब्यांच्या या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
याशिवाय, गुड फ्रायडे आणि इस्टर सणाच्या गर्दीचा विचार करून दक्षिण पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने यशवंतपूर-मडगावदरम्यान विशेष गाड्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. गाडी क्र. ०६२७१ यशवंतपूरहून २ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी रात्री २३:५५ वाजता सुटेल. तर परतीची गाडी क्र. ०६२७२ मडगावहून ५ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी सकाळी ११:०० वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे बंगलुरू कॅन्टोन्मेंट येथे पोहोचेल.
१९ डब्यांची ही गाडी कारवार, उडुपी आणि कुंदापुरा या स्थानकांवर थांबणार आहे. या सर्व विशेष गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रिया १ एप्रिल २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. या सुविधेचा लाभघ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
Web Summary : Railways introduces Mumbai-Madgaon weekly special train from April 5 to June 7, 2026, and Yesvantpur-Madgaon specials for Good Friday/Easter. Bookings open April 1, 2026. This offers relief to Konkan-bound travelers.
Web Summary : रेलवे ने 5 अप्रैल से 7 जून, 2026 तक मुंबई-मडगाँव साप्ताहिक विशेष ट्रेन और गुड फ्राइडे/ईस्टर के लिए यशवंतपुर-मडगाँव विशेष ट्रेनें शुरू कीं। बुकिंग 1 अप्रैल, 2026 को खुलेगी। इससे कोंकण जाने वाले यात्रियों को राहत मिलेगी।