पारवडेश्वर महाराजांचे निर्वाण

By Admin | Updated: June 23, 2015 01:21 IST2015-06-23T01:21:02+5:302015-06-23T01:21:10+5:30

फोंडा : भारताच्या आधुनिक संतपरंपरेतले संत, समाजसुधारक, अध्यात्माचे उपदेशक तसेच लाखो लोकांना हितबोध करून त्यांना दिशा देणारे योगीराज

Nirvana of Pardeshwar Maharaj | पारवडेश्वर महाराजांचे निर्वाण

पारवडेश्वर महाराजांचे निर्वाण

फोंडा : भारताच्या आधुनिक संतपरंपरेतले संत, समाजसुधारक, अध्यात्माचे उपदेशक तसेच लाखो लोकांना हितबोध करून त्यांना दिशा देणारे योगीराज श्री पारवडेश्वर महाराजांचे (वय ४७) सोमवारी सकाळी ११.३0 वाजता महानिर्वाण झाले. किरकोळ आजाराने त्रस्त असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पारवडेश्वर महाराजांचे पार्थिव तळेखोल-बेतोडा येथील गायत्री पीठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून मंगळवार दि. २३ रोजी दुपारी ३ वाजता समाधी विधी पार पाडला जाईल.
पारवडेश्वर महाराजांनी गोवा-कर्नाटक सीमेवरील पारवड गावात अवतीर्ण होऊन समाजसुधाराचे व आध्यात्मिक उपदेशाचे कार्य प्रारंभ केले. तेव्हापासून अखेरच्या क्षणापर्यंत ते अव्याहतपणे लोकसेवेचे, दीनोद्धाराचे व सामाजिक सेवेचे कार्य करीत आले असून, संपूर्ण जगभर महाराजांनी सुमारे २८५ समाजसेवेचे मठ स्थापन केले आहेत. केवळ गोमंतकच नव्हे, तर संपूर्ण जगभर महाराजांचा शिष्यगण विखुरलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांना ‘जागतिक शांतिदूत’ ही उपाधी दिली होती.
महाराजांनी लाखो लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे संसार पुन्हा मार्गी लावले आहेत. सामाजिक एकता अबाधित राखण्यासाठी त्यांनी सर्वधर्म संमेलनाचे आयोजन केले. गेली २५ वर्षे हे संमेलन नियमित सुरू आहे. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख अशा सर्व धर्मांचे धर्मगुरू एकाच व्यासपीठावर येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात. कुटुंबात शांती असेल तरच समाजात शांती नांदेल, हे सूत्र मानणाऱ्या महाराजांनी कुटुंबात शांती नांदावी, यासाठी दाम्पत्य आशीर्वचन सोहळे आयोजित केले. (पान ८ वर)

Web Title: Nirvana of Pardeshwar Maharaj