नायगावातील गावठी दारू अड्डय़ावर छापा

By Admin | Updated: June 22, 2015 02:19 IST2015-06-22T02:19:25+5:302015-06-22T02:19:27+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, चार हजार लीटरवर दारू जप्त.

Naigawas bastard raid on liquor | नायगावातील गावठी दारू अड्डय़ावर छापा

नायगावातील गावठी दारू अड्डय़ावर छापा

पणजी : जागतिक योगदिनानिमित्त रविवारी राज्यभर हजारो जणांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. विद्यालये आणि काही सरकारी संस्थांकडूनही योगासने आयोजिली होती. त्यामुळे राज्य योगमय झाले. डायोसेझन सोसायटीची विद्यालये मात्र बंद राहिली.
राज्यभरात ८० टक्के शैक्षणिक संस्थांकडून प्रात्यक्षिके केल्याची माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली. सरकारी विद्यालये आणि काही अपवाद वगळल्यास अनुदानित विद्यालयांकडून योगदिन साजरा करण्यात आला. पणजीत तीन ठिकाणी शासकीय पातळीवर सार्वजनिक योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आरोग्य भारती आणि गोवा सरकारतर्फे संयुक्तपणे कार्यक्रम झाला. मिरामार येथील गास्पार डायस सभागृहात आरोग्य खात्यातर्फे तर कांपाल येथील क्रीडा प्राधिकरणाच्या इनडोअर स्टेडियमवर एनसीसीतर्फे योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. डॉन बॉस्को संस्थेची बहुतेक विद्यालये बंद होती; परंतु संस्थेचे जे विद्यार्थी एनसीसीचे घटक होते, त्या विद्यार्थ्यांनी योगासने केली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नेमक्या किती शैक्षणिक संस्थांकडून योगासने करण्यात आली, याची माहिती मिळण्यास किमान तीन दिवस जातील, अशी माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली.
(आणखी वृत्त हॅलो ४)

Web Title: Naigawas bastard raid on liquor