शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नाताळसाठी गोव्यात येताना अपघातात आई जागीच ठार

By admin | Updated: December 26, 2014 02:10 IST

सावर्डेजवळील घटना : पत्नी, दोन मुलांसह चौघे जखमी

सावर्डे : नाताळ साजरा करण्यासाठी गोव्यात येताना वाटेत अपघात होऊन आईला मुकावे लागले. पत्नी व मुलांबरोबरच स्वत:ही जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. ही हृदयद्रावक घटना सावर्डे भागात गुरुवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी घडली. उपलब्ध माहितीनुसार सर्जापूर रोड, बंगळुरू येथील सोमेश निमयचंद अवदी (४२) हे आई बेतिका निमयचंद अवदी (६४), पत्नी इप्सीता सोमेश अवदी (३७), मुलगा श्रेश (७) व मुलगी स्वरणिका (४) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास गाडी (केए 0३ एमएस ४७१२) ही ‘एक्सयुव्ही’ घेऊन गोव्यात येत होते. बंगळुरूहून हुबळीमार्गे गोव्यात येत असता पेरिउदक, सावर्डे येथे सकाळी १0.३0 वाजण्याच्या सुमारास चालक सोमेश अवदी यांचा गाडीवरचा ताबा सुटून ती रस्त्याच्या डाव्या बाजूने सुमारे १५ मीटरपर्यंत फरफटत गेली व झाडावर धडकली. गाडीतील बेतिका अवदी यांचा चिरडून मृत्यू झाला. चालक सोमेश अवदी, त्यांचा मुलगा श्रेश, मुलगी स्वरणिका व पत्नी इप्सीता अवदी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना काकोडा-कुडचडे येथील सरकारी इस्पितळात व नंतर मडगावच्या खासगी हॉस्पिटलात पाठविले. सावर्डेचे सुहास सावर्डेकर व इतर लोकांनी जखमींना मदत केली. हवालदार प्रदीप नाईक यांनी पंचनामा केला. पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर तपास करीत आहेत. (लो.प्र.)