शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

खाण घोटाळा ३५ हजार कोटींचा, पण ३५ रुपयेही वसुली नाही; कॅप्टन विरियातो यांची सरकारवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 1:33 PM

चर्चेचे दिले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील खाण व्यवसायात ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप भाजप नेत्यांनी करून खाण व्यवसाय बंद केला; पण गेल्या १२ वर्षांत ३५ रुपये वसुली करण्यात सरकारला जमलेले नाही. संजीवनी साखर कारखाना बंद करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सरकारातील नेत्यांनी केला आहे. इतर देशांतून काजू आयात केली जात असल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत, असे उद्‌गार दक्षिण गोव्याचे इंडिया आघाडीचे काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काढले.

सावर्डे मतदारसंघातील खाणी तसेच संजीवनी साखर कारखाना बंद करून इथल्या सामान्य जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे खाण अवलंबित व संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक व कामगारांची स्थिती बिकट बनली आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी खाणी सुरू करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आश्वासन गेल्या १० वर्षांत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे डबल इंजिन सरकारची गॅरंटी यावेळी गोव्यातील जनता फोल ठरविणार असल्याचे कॅप्टन फर्नाडिस यांनी सांगितले. फर्नांडिस यांनी इतर कार्यकर्त्यांसह सावर्डे मतदारसंघाचा दौरा केला. 

यावेळी तारा केरकर, सावर्डे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष जयेश पाटील, गौतम (श्याम) भंडारी, संकेत भंडारी, त्रिबेलो सौझा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कॅप्टन फर्नाडिस यांनी दिली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसsouth-goa-pcदक्षिण गोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४