शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह आहारात पाल; २२ विद्यार्थ्यांना बाधा

By admin | Updated: July 1, 2015 00:53 IST

कुंभारजुवे : भोम येथील महानंदू नाईक मेमोरियल हायस्कूलमध्ये पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारात मेलेली पाल सापडल्याने २२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

कुंभारजुवे : भोम येथील महानंदू नाईक मेमोरियल हायस्कूलमध्ये पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारात मेलेली पाल सापडल्याने २२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यातील ४ विद्यार्थ्यांना बेतकी येथील आरोग्य केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले असून १८ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.मंगळवार, दि. ३० रोजी मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारातील भाजीमध्ये पाल सापडल्याने भाजी खाल्लेल्या विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. तत्काळ त्यांना हायस्कूलच्या बालरथातून शिक्षक अरुण भोसले व शिक्षिका मेघा देसाई यांनी बेतकी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. यात सातवी व आठवीत शिकणाऱ्या १८ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनींचा समावेश होता. आरोग्य केंद्रात डॉ. उगम तारी यांनी त्यांच्यावर त्वरित उपचार केले.मुख्याध्यापक दामोदर फडते, पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास नाईक, फोंडा भाग शिक्षणाधिकारी पुष्पा बोरकर, भोमचे माजी सरपंच सुनील जल्मी, पंच दामोदर नाईक यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.मडकई येथील महिला एकता स्वयंसाहाय्य गटातर्फे २००६ पासून हायस्कूलला माध्यान्ह आहाराचा पुरवठा केला जातो; पण अशी घटना कधी घडली नव्हती, असे गटाच्या प्रमुख हर्षाली काळे यांनी सांगितले. शिक्षण खाते, पालक-शिक्षक संघटना व शिक्षकांनी याकडे अधिक लक्ष देऊन असा प्रकार पुन्हा घडू नये, याची खबरदारी घ्यावी, असे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले. (प्रतिनिधी)