शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

कारगाड्या चोरट्यांची टोळी मुंबईत जेरबंद

By admin | Updated: July 8, 2014 01:20 IST

पणजी : जस्ट डायल या लोकांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या टेलीफोन सुविधेचा गैरवापर करून कारगाड्या चोरण्याचा धंदा करणारी टोळी घरफोड्या रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने पकडली.

पणजी : जस्ट डायल या लोकांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या टेलीफोन सुविधेचा गैरवापर करून कारगाड्या चोरण्याचा धंदा करणारी टोळी घरफोड्या रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने पकडली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे नितीश गणेश नाईक आणि राजीव शर्मा अशी आहेत. राजीव हा मुंबई येथील आहे, तर नितीश हा मूळ वास्को येथील आहे; पण तो मुंबईला राहातो. मुंबई येथील मिरारोड येथे सकाळी ७ वाजता या दोघांनाही उत्तर गोवा घरफोडी विरोधी पथकाने पकडले. मंगळवारी दुपारी त्यांना पणजीत आणल्यावर पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ४ दिवसांचा रिमांड त्यांना मिळविला आहे. पोलीस पथकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी ही माहिती दिली. गोव्याहून चोरण्यात आलेली एक गाडी मुंबईला सापडल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर याची चौकशी सुरू झाली आणि या रॅकेटचाही शोध लावण्यात पथकाला यश मिळाले. चोरलेल्या ५ पैकी २ कारगाड्या पोलिसांनी गोव्यात आणल्या. अन्य एक कारही कुठे ठेवली आहे याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली. जप्त केलेल्या गाड्यांचे क्रमांक जीए-०६-डी- ७८१४ (रूपेरी रंगाची स्विफ्ट) व जीए-०३- पी ९०१४ (निळ्या रंगाची स्विफ्ट)असे आहेत. कारगाड्या चोरीच्या तक्रारी वेर्णा, पणजी आणि कळंगुट येथील पोलीस स्थानकांत नोंद झाल्या होत्या. (प्रतिनिधी)