शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा गैरवापर करणार्‍यांवर करडी नजर

By admin | Updated: May 29, 2014 07:17 IST

पणजी : सोशल मीडियावरून द्वेष किंवा जातीय तेढ निर्माण करणार्‍यांवर आता करडी नजर राहाणार आहे.

 पणजी : सोशल मीडियावरून द्वेष किंवा जातीय तेढ निर्माण करणार्‍यांवर आता करडी नजर राहाणार आहे. समाजाला चिथावणी देणार्‍या अथवा तशा पद्धतीची आक्षेपार्ह विधाने फेसबुक किंवा अन्य कोणत्याही सोशल मिडियावर करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा नव्यानेच स्थापन झालेल्या फोरमचे सावियो रॉड्रिग्स यांनी पत्रकार परिषदेत दिला. देऊ चोडणकर याने नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या शेरेबाजीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांतील नागरिकांनी एकत्र येऊन ‘सोशल मीडिया नॉट अ फोरम टू स्प्रेड हेट्रेड’ या नावाने मंच स्थापन केला आहे. मानसोपचारतज्ज्ञ तथा अभिनेत्री मीनाक्षी मार्टिन्स, गोवा क्रॉनिकलचे सावियो रॉड्रिग्स, गोमंतकीय फेसबुक फोरम गोवा प्लसचे प्रशासक रोहन गोवेकर व चार्टर्ड अकाउंटंट सुनीला मुजावर या मंचचे सदस्य आहेत. मार्टिन्स म्हणाल्या की, गोमंतकीय शांतताप्रिय आहेत; परंतु काहीजण चिथावणी देणारी विधाने सोशल मीडियावरून करतात आणि त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशा लोकांना तसे करण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. गोमंतकीय शांतताप्रिय आहेत; परंतु चिथावणी दिल्यास काय घडू शकते, हे आपण दहा वर्षांपूर्वी सावर्डे दंगलीच्या वेळी अनुभवले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच; परंतु त्याचबरोबर समाजात तेढ निर्माण होईल, असे काही होता कामा नये, असे सावियो म्हणाले. देशाची किंवा राज्याची सुरक्षा, नीतिमूल्ये, बदनामीकारक किंवा सार्वभौमत्वाला बाधा येईल अथवा न्यायालयाचा अवमान होईल, अशी कोणतीही विधाने करण्यास घटनेच्या कलम १९ (२) नुसार निर्बंध आहेत. सोशल मीडियावर आज ज्या पद्धतीची विधाने केली जात आहेत, ती पाहता वेळीच पायबंद न घातल्यास स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)