तोकड्या कपड्यातील ललना, खिशाला लावून जातात चुना; महिलांचेही मोठे डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:18 IST2022-12-02T13:17:51+5:302022-12-02T13:18:24+5:30

भव्य-दिव्यतेचा भपका; फेसाळणारा उत्साह

Lalana in the cloth, the lime is attached to the pocket; Women's big innings too | तोकड्या कपड्यातील ललना, खिशाला लावून जातात चुना; महिलांचेही मोठे डाव

तोकड्या कपड्यातील ललना, खिशाला लावून जातात चुना; महिलांचेही मोठे डाव

नरेश डोंगरे / आशिष रॉय
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी (गोवा) : छोट्या बोटीच्या माध्यमातून एकदा कॅसिनोच्या जहाजावर प्रवेश केल्यानंतर सारेच भव्य-दिव्य असल्याचा भास होतो. अंतर्गत झगमगाट, तोकड्या कपड्यातील महिला-मुली आणि फेसाळणारा उत्साह पाहून काही क्षणासाठी अनेकांची मती आणि स्थिती गुंग झाल्यासारखी होत नसेल तर नवलच. त्याच अवस्थेतच अनेकांचे खिसे खुलतात अन् काही वेळेनंतर ते रिकामेही होतात.

मांडवीच्या किनाऱ्यावर फुटपाथलगत कॅसिनो संचालकांनी पॉश ऑफिसेस थाटली आहेत. येथे कूपन दाखवून एन्ट्री फीची विचारणा करणाऱ्या ग्राहकांकडून दोन हजारांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत मनमानी एन्ट्री फी घेतली जाते. त्यानंतर ग्राहकांच्या हातावर विशिष्ट बँड बांधले जातात. ते बँड पाहूनच बाऊन्सर ग्राहकाला आतमध्ये प्रवेश देतो. तेथून ग्राहकाला कॅसिनोवर नेण्यासाठी एक छोटी बोट येते. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने ही बोट नदीपात्रात असलेल्या विशाल जहाजावर (कॅसिनोत) ग्राहकाला नेऊन सोडते. तेथील  कॅसिनाेत चक्रीपासून तीन पत्ती, अंदर बाहर असे विविध जुगाराचे पर्याय असलेले वेगवेगळे टेबल सजलेले असतात. या टेबलवर कूपन घेऊन ग्राहक जातो आणि डाव लावतो. पहिला दुसरा डाव हमखास जिंकतो, नंतर आत्मविश्वास वाढला की आणखी डाव खेळतो. त्यातून लालसा वाढते, नंतर  खिशातील रोकड कधी संपते ते त्याचे त्यालाही कळत नाही.

महिलांचेही मोठे डाव
जुगार खेळण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटांतील जत्थेच्या जत्थे कॅसिनोत येत असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या गर्दीत तरुणी आणि महिलासुद्धा नोटांच्या रूपातील कॉईनची गड्डी घेऊन टेबलवर बसलेल्या दिसतात. पुरुषांसोबत त्यासुद्धा उत्साहाने मोठमोठे डाव लावतात. 

सुंदर ललनाकडे पाहून लागताे चुना
जुगार खेळणाऱ्याला बसल्या ठिकाणी पाहिजे ती दारू उपलब्ध करून दिली जाते. दारू पिऊन तरंगलेल्या अवस्थेत जुगारावर डाव लावताना सुंदर ललना एकप्रकारे जुगारावर मोठा डाव लावण्यासाठी ग्राहक बनून आलेल्या आणि जुगारी बनलेल्या व्यक्तीला प्रोत्साहित करत असतात. 

Web Title: Lalana in the cloth, the lime is attached to the pocket; Women's big innings too