कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:39 IST2026-02-24T17:38:27+5:302026-02-24T17:39:25+5:30

Mumbai-Madgaon Konkan Kanya Mandovi Express Coach Increase: सर्वाधिक मागणी आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या तसेच मांडवी एक्स्प्रेसचे डबे कायमस्वरुपी वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

konkan railway decided to augment extra coaches in the konkan kanya and mandovi express trains on a permanent basis know all details | कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या

कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या

Konkan Kanya Express Latest News: कोकणरेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच ट्रेनना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही ट्रेनच्या लेटमार्कमुळे कोकणरेल्वेबाबत प्रवाशांमध्ये संताप वाढत चालल्याचे म्हटले जात आहे. यातच सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला जादा डबे कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना कायम जादा जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक २०१११ आणि ट्रेन क्रमांक २०११२ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव गोवा कोकणकन्या एक्स्प्रेस ट्रेनला ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी २०२६ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. 

कोकणकन्या-मांडवी ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या

कोकणकन्या एक्स्प्रेसप्रमाणेच ट्रेन क्रमांक १०१०३ आणि ट्रेन क्रमांक १०१०४ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव गोवा मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी २०२६ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे सुमारे १६६ अधिक जागा कायमच्या वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, या दोन्ही ट्रेन LHB डब्यांसह चालवल्या जातात. कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला सध्या फर्स्ट एसी+ २ टियर एसीचा १ डबा, २ टियर एसीचा १ डबा, ३ टियर एसीचे ४ डबे, ३ टियर इकॉनॉमीचे २ डबे, स्लीपर ०७ डबे, जनरल ०४ डबे, खानपान सेवेचा १ डबा, जनरेटर कार १ डबा आणि एसएलआर याचा १ डबा असून, एकूण २२ कोचसह या दोन्ही ट्रेन चालवल्या जातात. आता ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आल्यावर या दोन्ही ट्रेन २३ कोचसह धावणार आहेत.

 

Web Title : कोंकण रेलवे ने कोंकण कन्या, मांडवी एक्सप्रेस में डिब्बे जोड़े।

Web Summary : कोंकण रेलवे ने कोंकण कन्या और मांडवी एक्सप्रेस में स्थायी रूप से अतिरिक्त डिब्बे जोड़े। इससे प्रत्येक ट्रेन में लगभग 166 अतिरिक्त सीटें मिलेंगी, जिससे फरवरी 2026 से कोंकण यात्रियों को लाभ होगा।

Web Title : Konkan Railway adds coaches to Konkan Kanya, Mandovi Express trains.

Web Summary : Konkan Railway permanently adds extra coaches to Konkan Kanya and Mandovi Express. This will provide approximately 166 additional seats on each train, benefitting Konkan travelers from February 2026.