शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

कदंब बस अपघातातील जखमींना नागरिकांची मदत

By admin | Updated: June 17, 2014 01:47 IST

कोपार्डे (जि. कोल्हापूर) : कोपार्डे-आडूरनजीकच्या वळणावर कदंब बसने झाडाला दिलेली धडक इतकी जोरात होती की, स्फोट झाल्यासारखा

कोपार्डे (जि. कोल्हापूर) : कोपार्डे-आडूरनजीकच्या वळणावर कदंब बसने झाडाला दिलेली धडक इतकी जोरात होती की, स्फोट झाल्यासारखा आवाज होऊन गाडी पुढील व मागील बाजूने दोन झाडांवर धडकली. या वेळी चालक वाहकाच्या सीटवर येऊन पडला होता. त्याच्यासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतल्या. जखमींना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठवून दिले. गंभीर जखमींवर प्राथमोपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविले. ग्रामस्थांनी प्रवाशांचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य एकत्र करून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, अपघाताची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली. पोलीस भरतीमध्ये व्यग्र असलेले अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपअधीक्षक वैशाली माने, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघात कसा झाला, याची माहिती घेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांशी त्यांनी संपर्क साधला. मृत बसचालक मेल्वीन फर्नांडिस यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाउ असा परिवार आहे. दहा वर्षे त्यांनी रोजंदारीवर चालक म्हणून काम केले. सहा वर्षांपूर्वी त्यांना कायम केले होते. आले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. जखमींत गोव्याचा एकही प्रवासी नाही. (वार्ताहर)